Hot Posts

6/recent/ticker-posts

येणाऱ्या नव्या वर्षाचे स्वागताच्या खर्चास फाटा देऊन सिद्धेश्वर प्रशालेय तर्फे विधायक उपक्रमांचे आयोजन !


येणाऱ्या नव्या वर्षाचे स्वागताच्या खर्चास फाटा देऊन सिद्धेश्वर प्रशालेय तर्फे विधायक उपक्रमांचे आयोजन !





येणाऱ्या नव्या वर्षाचे स्वागताच्या खर्चास  फाटा देऊन सिद्धेश्वर प्रशाला आणि कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजातील वंचित घटकातील  विद्यार्थ्यांसाठी विधायक उपक्रम हाती घेतले आहे.
मुळेगाव रोड येथील पारधी समाजाच्या मुलांसाठी संस्कार संजीवनी आश्रम शाळा कार्य करीत आहे . मात्र या आश्रम शाळेसमोर प्रति दिवशी आभाळाएवढी संकटे येत असतात. या आश्रम शाळेकडे पडीक खोल्यांच्या वास्तु शिवाय अन्य सोयी सुविधा नाहीत. या आश्रम शाळेत विविध आरोपातील शिक्षा झालेल्या आरोपींची मुले , ज्यांना आई-वडिलांचे छत्र नाही असे लहान मुलांचे संगोपन या संस्थेच्या वतीने करण्यात येत असतो. या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सिद्धेश्वर प्रशाला आणि  कन्या प्रशालेच्या 1987 -88 या  बॅचच्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मनोरंजनाचे आणि क्रीडा विषयक साहित्य या आवारात बसवून दिले .यावेळी व्यासपीठावर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ब्रिजमोहन फोपलिया,  या उर्मिला गायकवाड आगरकर),सरपंच आप्पासाहेब पाटील , विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष देविदास चेळेकर यांची उपस्थिती होती.गाव खेड्याच्या दूर अंतरावर असलेल्या  आश्रम शाळेतील हा कार्यक्रम एक प्रकारचं मायेची ऊब देणारा ठरला . या कार्यक्रमामुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावर हास्य फुलले .आमच्या शाळेस नववर्षाची भेट मिळाली .सर्व विद्यार्थी या भेटीमुळे आनंदित झाले आहेत. असे म्हणत या उपक्रमाबाबत परमेश्वर काळे यांनी आभार मानले....आमच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत असतो. मागील पाच वर्षांपासून शहरातील अनेक समाज कार्यात सहभाग  घेत असून याचा समाधान असल्याच मत आपल्या प्रास्ताविकात चन्नवीर चिटटे यांनी सांगितले...शाळेतील मैत्रीमुळे ही संघटना उभारली असून याचा उपयोग समाजातील लहान साल घटकासाठी उपयोग होत असतो याचा आनंद असल्याचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फोफलिया आणि जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग रजपूत  यांनी सांगितले...कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसवराज कलशेट्टी ,जवाहर उपाध्ये, राजकुमार कोळी, अनिल शहा चंद्रकांत  मुंडे , सोमनाथ चाकोते श्रीपाद वेणेगुरकर   गौरी उपासे आशा मेहता रवी बिद्री,  आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना पुजारी यांनी केलं तर आभार अनुप्रिता अंदेली यांनी मानले .


Reactions

Post a Comment

0 Comments