सांगोल्याच्या तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयात राहण्याच्या आदेशाला दाखवली केराची टोपली,मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याचा सामाजिक कार्यकर्ते रणजित सावंत यांनी दिला इशारा
सांगोला (प्रतिनिधी) शासनाच्या आणि केंद्रशासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत,यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात, यापैकी महत्वाचा प्रयत्न म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी मुख्यालयात राहणे होय,परंतु वित विभाग शासन निर्णय क्र- घभाभ-/१०१५/ प्र.क्र १ सेवा ५ दिनांक ७ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या शासन आदेशाला सांगोल्याच्या तालुका वैदकीय अधिकारी सीमा दोडमणी यांनी केराची टोपली दाखवली आहे. तालुका वैदकीय अधिकारी असलेल्या सीमा दोडमणी या सोलापूर या ठिकाणाहून सांगोला येथे दररोज ये-जा करत असल्याने कार्यलयीन कामकाज करण्यापेक्षा प्रवासातच त्यांचा बराच वेळ जात असल्याने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.येथील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर अनेक लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे.तालुका वैदकीय अधिकारी यांनी कार्यालयाच्या ठिकाणी न राहिल्यास त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रणजित सावंत यानी दिला आहे.
कार्यलयीन कामकाजाची वेळ सकाळी दहा, ते सहा असताना या मात्र नेहमीच कार्यालयात उशिरा येतात,आणि पाच वाजता तर घराचे अंतर जवळ करतात,असे कित्येक नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर तक्रारी सांगितल्या आहेत. तालुक्यात सर्वत्र डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असताना दोडमणी मॅडम मात्र याचे खापर मात्र दुसऱ्यावर फोडतात, आणि स्वतः मात्र नामेनिराळे राहत असल्याचे अनुभव अनेकांनी बोलून दाखविले आहे. जवळपास तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि चाळीस उपकेंद्र असताना या मात्र कधीतरीच प्रत्यक्ष त्या गावाला भेट देतात.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बोलविलेल्या आढावा बैठकीला ही त्यांनी दांडी मारली होती,आशा एक ना अनेक तक्रारी त्याच्याविरोधात वाढताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी मुख्यालयात राहून नागरिकांना भेडसावत असलेल्या आरोग्याच्या समस्या सोडवाव्यात,अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली आहे.तालुक्यातील बहुतांश प्रमुख कार्यालयाचे कार्यालय प्रमुख मुख्यालयाच्या ठिकाणी राहतात.येणाऱ्या काळात त्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहावे अन्यथा त्यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा ही रणजित सावंत यांनी दिला आहे.
0 Comments