Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला येथील पत्रकार दिलीप घुले व त्यांच्या पत्नी कविता घुले या दांपत्यानी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करुन लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

सांगोला येथील पत्रकार दिलीप घुले व त्यांच्या पत्नी कविता घुले या दांपत्यानी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करुन लग्नाचा वाढदिवस साजरा केला.









सांगोला (तालुका प्रतिनिधी): अनेकजण लग्नाचा वाढदिवस आपल्या परीने वेगवेगळ्या प्रकारे साजरा करीत असतो. कोणताही वाढदिवस म्हटला की हॉटेलमध्ये पार्टी, केक, मित्रपरिवार व वेगवेगळ्या प्रकारे आंनदोत्सव साजरा केला जात असतो. परंतु सांगोल्यातील एका दांपत्याने समाजीक भान ठेवत आपल्या लग्नाचा वाढदिवसी एक वेगळाच संकल्प केला आहे. सांगोला येथील पत्रकार दिलीप घुले व त्यांच्या पत्नी कविता घुले या दांपत्यानी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करुन लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
         सांगोला येथील पत्रकार दिलीप घुले व त्यांच्या पत्नी कविता घुले यांनी आपला लग्नाचा पंधरावा वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचे ठरविले. या वाढदिवसानिमित्त कोणतेतरी सामाजीक काम ठेवावे असे दोघांनाही वाटत होते. यावेळी पत्रकार म्हणून काम करीत असलेले दिलीप घुले यांनी आपण लग्नाच्या वाढदिवशी मरणोत्तर देहदान करुया अशी कल्पना आपल्या पत्नीपुढे मांडली. पतीच्या संकल्पनेला त्यांनीही लगेच होकार दिला. शुक्रवार 3 जानेवारी रोजी लग्नाच्या वाढदिवशी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करुन लग्नाचा वाढदिवस साजरा केला.  घुले दाम्पत्यांनी याबाबतचा संकल्प अर्ज डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सादर केला. साधी जीवनशैली जगणारे पत्रकार दिलीप घुले व त्यांची पत्नी कविता या पतीपत्नीने त्यांच्या लग्नाचा पंधरावा वाढदिवस मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून साजरा केला आहे.  दिलीप घुले यांनी मरणोत्तर देहदान संकल्पाचा अर्ज डॉ वैशंपायन स्मृती शासकीय विद्यालयाचे डॉ. होसमनी यांच्याकडे सादर केला. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शरीर रचनाशास्त्रात संशोधनासाठी मदत व्हावी, या उद्दात हेतुने दिलीप घुले व कविता घुले यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे.नश्‍वर देहाचा वैद्यकीय विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा म्हणून आपण मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. प्रत्येकानेच आपल्या परीने सामाजीक भाव ठेवुन सामाजीक कार्य केले पाहिजे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या देहाचा व अवयवांचा गरजूंना लाभ मिळावा यासाठी मी व पत्नीने एकमुखी देहदानाचा संकल्प घेतला आहे 
Reactions

Post a Comment

0 Comments