Hot Posts

6/recent/ticker-posts

नागरिकत्व सुधारणा विधेयक कायद्याच्या सन्मानार्थ शहरातून देश प्रेमी नागरिकांची व युवकांची रॅली काढण्यात आली.



नागरिकत्व सुधारणा विधेयक कायद्याच्या सन्मानार्थ शहरातून देश प्रेमी नागरिकांची व युवकांची रॅली काढण्यात आली.


सांगोला/प्रतिनिधी; नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ या विधेयकावर लोकसभेत व राज्यसभेत प्रदीर्घ चर्चा होऊन ते विधेयक बहुमताने नुकतेच मंजूर झाले यामुळे शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी नागरिकत्व सुधारणा विधेयक कायद्याच्या सन्मानार्थ सांगोला शहरातून देशप्रेमी नागरिकांची व युवकांची रॅली काढण्यात आली. यावेळी तहसीलदार योगेश खरमाटे यांना निवेदन देण्यात आले.१९४७ साली आपल्या देशाची फाळणी झाली व धर्मनिरपेक्ष भारत व इस्लामी तत्वावरआधारीत पाकिस्तान अशी दोन देशाची निर्मिती झाली.त्यानंतर १९७१ साली पाकीस्तानपासून बागलादेश वेगळा झाला.आपल्या सिमेला लागून पाकिस्तान बागलादेश व अफगाणिस्तान हे देश आहेत या तीनही देशात हिंदु, शीख,बौध्द,जैन,पारशी व खिश्चन हे अल्पसंख्याक आहेत परंतु या तीनही देशातील या अल्पसंख्याकांवर धर्माच्या नावाखाली
अनन्वित अन्याय झाल्याने ते हे देश सोडून भारतात गेली ६0-६५ वर्षे येत आहेत व सिमा भागात शरणार्थी म्हणून  जीवन जगत आहेत. याचे बोलके उदाहरण म्हणजे पाकिस्तानमध्ये या हिंदू जैन .शिख खिश्चन याची लोकसंख्या १३% होती ती आजकमी होऊन १.८५% इतकी झाली आहे, अशा शरणार्थींना या देशात कोणतेही हक्क प्राप्त नाहीत व ते भितीने परत बांगलादेश,पाकिस्तानात जाणेस इच्छुक नाहीत. या शरणार्थीना जगातील अन्य कोणतेही देश स्विकारण्यास तयार नाही अशा ३१ डिसेंबर २०१४ पर्यत भारतात आलेल्या हिंदू, बौध्द,शीख, पारशी,जैन,ख्रिश्चन शराणार्थी नागरीकांना या विधेयकाने भारताचे नागरीकत्व मिळणार आहे. त्यामूळे कायदयातील ही सुधारणा कोणत्याही भारतीयाविरुद्ध नाही.भारतीय मुस्लीमाच्या विरूध्द तर मुळीच नाही.त्याचबरोबर या तीनही देशातून घुसखोरी करून अनेक बांगलादेशी व पाकिस्तानी मुस्लीम भारतात आले आहेत. अशा घुसखोरी मुस्लिमांनाबांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान परत त्याच्या देशात घेऊ शकतात. त्यामुळे हेविधेयक आहे. ते पाकिस्तान बांगलादेश व अफगाणिस्तान मधील अल्पसंख्याकांबाबतचेआहेत. कायदयाने या तीन देशातील मुस्लीम हा अल्पसंख्य ठरू शकत नाही. त्यामुळे
पाकिस्तान, बांगलादेश मधील घुसंखोर मुसलमानांना नागरीकत्व देण्याचा प्रश्नच येत नाही.त्यामुळे या कायद्याने  भारतीयाने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. कायदयाचा व आसाममधील नागरीकांशी नॅशनल रजिस्टर सिटीझन अॅक्टशी (एनआरसी) काहीही सबंध नाही, कारण या नागरीकत्व कायदयाने नागरीकत्व देण्याचा विषय आहे. या कोणताही हक्क काढून घेण्याचा नाही. यामुळे सर्वांच्या वतीने कायद्याचा सनमान करून पोलिस प्रशासनावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध करत भारत माता की जय,वंदे मातरम या घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख, नगरसेवक बाळासाहेब केदार, अरविंद नाना केदार, अॅड. गजानन भाकरे, सीमा इंगोले, श्रीकांत पाटील, शिवाजीराव गायकवाड, सुनिल बिडकर, काशिलिंग गावडे, प्रा.संजय देशमुख, अनिरुद्ध पुजारी, नागेश जोशी, उत्तम चौगुले, नवनाथ पवार, गुंडा खटकाळे, समाधान सावंत, अच्युत फुले, विठ्ठल लिंगे, माणूस कमलापुरकर, डी.एस.सावंत, प्रा.संदीप सावेकर, वैजिनी देशपांडे, कॅप्टन साळुंखे आदी मान्यवरांसह नागरिक व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. राष्ट्रगीताने या  रॅलीचा समारोप झाला.300 फूट ध्वजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments