सहकार महर्षीच्या ३ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 9, 2020

सहकार महर्षीच्या ३ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन.

सहकार महर्षीच्या ३ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन.
अकलूज( विलास गायकवाड) - येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१९- २०२० च्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या ३लाख१व्या साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे विद्यमान संचालक भिमराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
       कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
           कारखान्याचा सिजन२०१९-२०२०चा  ऊस गळीत हंगाम दिनांक २४/११/२०१९  रोजी सुरू झाला असून, दिनांक ०८/०१/२०२० अखेर ३ लाख १८ हजार २४० मे. टन उसाचे गाळप होऊन ३ लाख १६ हजार १५० साखर पोत्यांचे उत्पादन झाले असून, सरासरी साखर उतारा १०.२३टक्के व आजचा साखर उतारा ११.२५ टक्के आहे. तसेच को-जनरेशन प्रकल्पामध्ये दिनांक २४/११/२०१९ पासून ०८/०१/२०२०पर्यंत  २ कोटी ८० लाख ६८ हजार ५३८ युनिट वीज निर्माण होऊन १ कोटी ७४ लाख ५७ हजार ५०७ युनिट वीज विक्री केलेले आहे. तसेच चालू सीझनमध्ये उपपदार्थ प्रकल्पातील डिस्लरीमध्ये दिनांक०८/०१/२०२० अखेर२६ लाख ८३ हजार ६९२ लिटर्स रेक्टिफाईड स्पिरिट तसेच १४ लाख ३४ हजार ४३२ लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले. असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली. साखर पोती पूजनाच्या कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील यांच्यासह सर्व संचालक, कारखान्याचे सभासद, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कामगार युनियन ,प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages