कामगार कर्मचारी विरोधी सरकार हाणून पाडण्यासाठी कामगारांची वज्रमुठ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 9, 2020

कामगार कर्मचारी विरोधी सरकार हाणून पाडण्यासाठी कामगारांची वज्रमुठ

    कामगार कर्मचारी विरोधी सरकार हाणून पाडण्यासाठी कामगारांची वज्रमुठ
                                                जेलभरो आंदोलनात 2250 कार्यकर्त्यांना अटक
 



सार्वत्रीक देशव्यापी संप यशस्वी !* 

*शहरात ठिकठिकाणी तब्बल 2 तास चक्काजाम*
घटनादत्त अधिकार नाकारणारे लोकशाही विरोधी सरकार देशासाठी धोक्याचे ! कॉ.आडम मास्तर* 
 
सोलापूर दिनांक :-  देशाच्या सर्वांगिण विकासासाठी आमचे सरकार असून देशाला प्रगतीपथावर नेत आहोत अशी पाल्हाळीक आश्वासने केंद्र सरकार देत आहे.रोजगार,शिक्षण, नागरिकत्व,संघटीत लढा, सामाजिक सुरक्षा,अधिकार आणि हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला याचे गांभीर्य लक्षात येत नाही ही अत्यंत चीड निर्माण करणारी बाब आहे.ज्या संविधानाने आम्हाला मूलभूत कर्तव्ये,अधिकार,हक्क घटनादत्त अधिकार बहाल केले तेच अधिकार सरकार काढून घेतले आहेत.ही लोकशाही संपवण्याचे द्योतक आहे असे ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले. बुधवार दिनांक 8 जानेवारी 20 रोजी सकाळी 11 वाजता सिटू व कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सार्वत्रीक देशव्यापी संपाची हाक दिली असून त्या अनुषंगाने शहरात ठीकठिकाणी व  गुरुनानक चौक येथे माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला.यावेळी पुढे बोलताना आडम म्हणाले की, विडी कामगारांना किमान वेतन व पेन्शन, धूम्रपान कायद्यातून विडी उद्योग वगळा,यंत्रमाग कामगारांना पिसरेट जाहीर करा व त्याची फरकासह अंमलबजावणी करा व भविष्य निर्वाह निधी लाभ द्या,नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करा, रेशन व्यवस्था मजबूत करा,कामात कपात, कामगार कपात थांबवा,नवीन रोजगाराची निर्मिती करा, सार्वजनिक उद्योग धंद्याचे खाजगीकरण रोखा ,सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी मंडळाचे असंघटीत कामगारांना लाभ द्या नाही तर याहून आक्रमक पवित्रा घेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू अशा शब्दांत जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केले.  यावेळी नगरसेविका कॉ कामीनीताई आडम यांच्या नेतृत्वाखाली गेंट्याल चौक येथे असंघटीत व घरेलू कामगारांनी रास्ता रोको केला.अँड एम एच शेख व कुरमय्या म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली जुना विडी घरकुल चंदन काटा हैद्राबाद महामार्गावर विडी कामगारांनी रास्ता रोको केले.नसीमा शेख, सुनंदा बल्ला , मुरलीधर सुंचू अशोक बल्ला , अनिल वासम यांच्या नेतृत्वाखाली आम्रपाली चौक येथे रास्ता रोको केले.किशोर मेहता यांच्या नेतृत्वाखाली यंत्रमाग कामगारांनी जुना अक्कलकोट नाका येथे रास्ता रोको केले.पूनम गेट मा जिल्हाधिकारी कार्यालय येथे अशोक इंदापुरे, सिद्धराम उमराणी यांच्या नेतृत्वाखाली शासकीय कर्मचारी व योजना कर्मचारी यांनी धरणे आंदोलन केले.सोलापूर महानगरपालिका येथे दिव्यांगासाठी इलियास सिद्दीकी व बाबूलाल फनिबंद यांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी होऊन ठिकठिकाणी रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले यावेळी 2250 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी सार्वत्रिक देशव्यापी संपात कॉ गोदूताई परुळेकर नगर व मिनाक्षीताई साने  ता.दक्षिण सोलापूर, मौजे कुंभारी येथे वसाहतीतील विविध स्थानिक व कामगारांच्या मागण्या घेऊन संस्थेचे व्यवस्थापक  युसूफ मेजर ,विल्यम ससाणे,वसीम मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली व कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तब्बल 4 तास रास्ता रोको करण्यात आला.यावेळी या रास्ता रोको आंदोलनाची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रं 2 च्या ज्योती पाटील यांनी  तहसिलदार मार्फत लेखी पत्र दिले. तहसिलदार अमोल कुंभार यांनी आंदोलनाच्या मागण्यांबाबत मा जिल्हाधिकारी यांच्या समवेत संबंधित सर्व अधिकारी यांची स्वतंत्र बैठक बोलावून प्रश्न निकाली लावण्याचे लेखी आश्वासन दिले अशा माहितीचे लेखी पत्र शिष्टमंडळास दिले. तदनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी कॉ नरसय्या आडम मास्तर, नगरसेविका कामिनी आडम, फातिमा बेग, युसूफ मेजर,विल्यम ससाणे,वसिम मुल्ला,नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, बापू साबळे ,विक्रम कलबुर्गी आदी उपस्थित होते.
सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी हसन शेख,रफिक काझी,आप्पाशा चांगले,सनातन म्हेत्रे,वसीम देशमुख,मधुकर चिल्लाळ, विनायक भैरी,नागमनी दंडगळ, निलोफर शेख,उमा मागानूर, आरिफा शेख,रुक्मिणी जक्कल, नसीमा पटेल, लक्ष्मी सिंदम,ज्योती गेंट्याल,विवी तारकश,बालाजी तुम्मा, डेव्हिड शेट्टी, गोविंद सज्जन,एजाज खलिफा ,अफसर शेख,श्रीनिवास गोन्याल,नवनीत अंकम,कुरमेश म्हेत्रे प्रभाकर गेंट्याल, जावेद पठाण,शफी शेख,संतोष पुकाळे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages