पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात "रायझिंग वीक" निमित्त शस्त्रांचे प्रदर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 10, 2020

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात "रायझिंग वीक" निमित्त शस्त्रांचे प्रदर्शन


पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात "रायझिंग वीक" निमित्त शस्त्रांचे प्रदर्शन
                                    (विद्यार्थ्यांचा प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद)


पंढरपूर/प्रतिनिधी ; 2 जानेवारी ते 8 जानेवारी यादरम्यान महाराष्ट्र पोलीस दलाकडून रायझिंग वीक साजरा केला जातो त्या अनुषंगाने पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडून दिनांक 7 जानेवारी व 8 जानेवारी या दिवशी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस दलाकडे असणाऱ्या शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शस्त्र प्रदर्शनामध्ये पोलिसांकडील 303 रायफल कार्बाइन, 9 MM पिस्टल, SLR, AK47, इंसाइज रायफल, 12 बोर रायफल अशी शस्त्रे ठेवण्यात आली होती, तसेच पोलिसांसाठी दैनंदिन कामकाजात उपयोगी येणारे साहित्य त्यामध्ये लाठी, हातकडी, ढाल, हेल्मेट हे साहित्य दाखवण्यात आले.यावेळी उपस्थितांना ट्रॅफिक साईन बोर्ड व ट्रॅफिकचे रूल्स याविषयी माहिती देण्यात आली. 
7 जानेवारी व 8 जानेवारी रोजी एकूण 20 ते 22 शाळांमधील जवळपास 2500 विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि इतर जनसामान्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
या प्रदर्शनाबाबत पंढरपूरकरांनी समाधान व्यक्त करून पोलीस दलाचे आभार मानले. यामुळे पोलीस-जनता संबंध अजून दृढ होईल. अशी प्रतिक्रिया पंढरपूरकरांमधून व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages