महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 23, 2020

महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन


सोलापूर दिनांक-   बुधवार दिनांक 22 जानेवारी सांय 7 वाजता दत्त नगर येथे महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिका सभापती श्रीनिवास करली व उद्योगपती गणेश गुज्जा यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धूल,संस्थापक सचिव अनिल वासम,संस्थापक उपाध्यक्ष मल्लेशम बडगू, नगरसेवक नागेश वल्याळ ,  राधिका पोसा, दत्तू पोसा, श्रीनिवास पुरुड, अशोक बल्ला ,जन्मोत्सव अध्यक्ष अँड श्रीनिवास कटकूर,कार्याध्यक्ष बाळकृष्ण मल्ल्याळ, नागेश सरगम,राजू कोंगारी, रमेश आवार,दयानंद मामडयाल,मल्लाण्णा सरगम,गौरीशंकर कोंडा अमरनाथ सामल , नरहरी कोक्कुल आदी उपस्थित होते.यावेळी जन्मोत्सव समिती अध्यक्ष अॅड. श्रीनिवास कटकूर यांनी आवाहन करताना म्हणाले की, सोलापूर शहरात मार्कंडेय जन्मोत्सव साजरा करणारे मंडळे मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावे व उत्सव काळात मार्गदर्शन व सल्लामसलत करावे जेणेकरून जन्मोत्सव शांत व आध्यात्मिक वातावरणात साजरा करून सामजिक उन्नतीचा संदेश द्यावे. तसेच 27 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता पद्मकलश घेऊन पार्क चौक  येथे पद्मध्वजारोहन कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages