इंद्रनिल व सहकाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 20, 2019

इंद्रनिल व सहकाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड




इंद्रनिल व सहकाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
अकलूज/प्रतिनिधी
येथील विक्रमसिंह माने-देशमुख यांचे चिरंजीव इंद्रनिल व त्यांच्या सहकाऱ्यांची अमेरिकेतील लेकलॅन्ड शहरामध्ये होणाऱ्या एसएई या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्काय स्टूपर्स या नावाने एक ग्रुप बनवून इंद्रनिल माने-देशमुख याने शुभम साबू, अनिकेत बारापत्रे, सलोनी एक्कल, हर्ष पांचाल, कार्तिक पांडेय, आदित्य आररा, आनंद बेलसारे, अनिश गिरनीकर, दुर्गेश पाटील, इशान नाडगौडा, कौस्तुभ कुलकर्णी, मंदार माने, निखील लिखार, ओंकार नगरकर, पृथ्वीराज कदम, साक्षी श्रीखांडे, सिद्धेश खोट, तुषार गुप्ता व अमित मुलेय या सहकाऱ्यांना बरोबर घेवून अनेक स्पर्धा जिंकल्या. भारतामधून या संघाची निवड अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.
अमेरिकेतील एसएई ही जागतिक स्तरावरील ऑटोमोबाईल इंजिनिअर्स कंपनी आहे. ही कंपनी जागतिक स्तरावर सक्रिय व्यावसायिक संघटना आणि विविध उद्योगांमधील अभियांत्रिकी व्यावसायिकांसाठी मानक विकसित करणारी संस्था आहे. ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस आणि व्यावसायिक वाहने यासारख्या परिवहन उद्योगांवर त्यांचा मुख्य भर आहे. नवोदित एरोस्पेस इंजिनिअर्सच्या गुणांना वाव मिळावा यासाठी एरोस्पेस या स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा मार्च महिन्यामध्ये अमेरिकेत होणार असून त्यासाठी भारतामधून स्कार्य स्टूपर्स या संघाची निवड झाली आहे. एसएई या संस्थेचे अध्यक्ष पॉल मास्करेनास हे पुणे येथे आल्यानंतर त्यांनी या संघाचे सादरीकरण पाहून त्यांचे कौतुकही केले होते. स्काय स्टूपर्स हा संघ कोथरुड येथील एम.आय.टी.कॉलेज ऑफ इंजिनीअरींग मध्ये शिक्षण घेत आहेत. या स्पर्धेच्या अनुषंगाने प्रोटोटाईप विमान तयार करून त्याची चाचणी वेळापूर येथील पालखी मैदानावर घेण्यात आली. या चाचणीमध्ये स्पीड, पीच अँगल, ऑलटीट्युड, लोड योआ एड्युरन्स, एअर वर्दीनेस याचा डेटा जमा करण्यात आला असून पुढील विमानामध्ये सुधारणा करणार असल्याचे इंद्रनिल माने-देशमुख यांनी सांगितले.
अशा नवोदित युवकांमुळे भारतातील एरोस्पेस इंजिनिअरींगला नवीन चालना मिळेल व मेक इन इंडियाची संकल्पना फलरूपाला येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages