कापसेवाडीच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांची मुख तपासणी
माढा / प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार माढा तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाखाप्रमुखांची एकदिवसीय कार्यशाळा गटशिक्षणाधिकारी मारूती फडके यांनी घेतल्यानंतर तात्काळ शाखाप्रमुखांनी तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न अभियान राबविण्यास सुरूवात केली असून याचाच एक भाग म्हणून कापसेवाडी-हटकरवाडी येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची मुख तपासणी मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रशांत पलंगे व त्यांच्या टीमने करून अहवाल दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक सुनील खोत यांनी केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रशांत पलंगे म्हणाले की,जी माणसे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात त्यांच्या तोंडाची दुर्गंधी येते,दात किडतात व पिवळे पठतात,हिरड्या कमकुवत बनतात व दात किडतात, चेह-यावर सुरकुत्या पडतात,भूख मंदावते,अशक्तपणा येतो,बौद्धिक व शारीरिक विकास मंदावतो, डोळे जळजळतात,स्ञीयांना वंध्यत्व व पुरुष नपुंसक बनतात तसेच निकोटीनमुळे मेंदूवर विपरित परिणाम होतो.अनेकांना भयंकर अशा कॅन्सरची लागण होवून मृत्यू ओढावतो त्यामुळे कोणीही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नका व इतरांना करू देवू नका याचबरोबर पौष्टिक व संतुलित आहार आणि पुरेसा व्यायाम करावा तसेच इतर वाईट व्यसनाच्या आहारी जावू नका असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण,तुकाराम कापसे, तनुजा तांबोळी,प्रविणकुमार लटके, शिवाजी भोगे,सचिन क्षीरसागर, सुधीर टोणगे,सुपरवायझर सुमन गाडेकर,शिवाजी तांदळे,नंदकुमार मुकणे,आरोग्यसेवक पांडूरंग गवसाणे,सागर राजगुरु,लहू गवळी यांच्यासह विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:
Post a Comment