दत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथे राष्ट्र संत गाडगेबाबा स्मृतिदिन साजरा. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 20, 2019

दत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथे राष्ट्र संत गाडगेबाबा स्मृतिदिन साजरा.

दत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथे राष्ट्र संत गाडगेबाबा स्मृतिदिन साजरा.



दि:-२०/१२/२०१९ वार शुक्रवार रोजी दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी या दोन्ही शाळेत राष्ट्र संत गाडगेबाबा स्मृतिदिन साजरा  करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक  चंद्रकांत लोखंड सर तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती क्रीडा,शिक्षण व समाजसेवी संस्था,उपळाई(ठोंगे) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन ठोंगे उपस्थित होते
                कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्यावर आधारित स्वलिखित कविता युवराज जगताप सर यांनी सादर केली तर श्री.श्रीकांत कुंभारे सर यांनी गाडगेबाबा याच्यावर आधारित माहिती आपल्या मनोगतातून विध्यार्थ्यांना सांगितली
मोहन ठोंगे सरांनी माणसाने माणसाशी माणसासम
वागावे,दगड धोंड्याची पूजा करण्यात वेळ घालवू नये हे बाबांचे विचार कायम स्मरणात ठेवावेत असे सांगितले अध्यक्षीय भाषणातून चंद्रकांत लोखंडे  यांनी विद्या शिका व गरिबांना विध्येसाठी मदत करा हे बाबांचे विचार आज ही किती महत्वाचे आहेत हे पटवून दिले.
              सदर कार्यक्रमास युवराज जगताप सर, श्रीकांत कुंभारे , संगीता काळे मॅडम, अरुणा मठपती मॅडम , मंगेश मोरे सर ,सचिन काळे , राहुल ठोंगे ,संतोष ठोंबरे ,विलंबिनी पाटील मॅडम व सेवक दत्ता ठोंगे,संदीप भोरे आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages