अकलूजमध्ये आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त २२डिसेंबर रोजी पुरस्कारांचे वितरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 20, 2019

अकलूजमध्ये आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त २२डिसेंबर रोजी पुरस्कारांचे वितरण



अकलूजमध्ये आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त २२डिसेंबर रोजी पुरस्कारांचे वितरण                         





अकलूज(प्रतिनिधी)साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त  मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका अध्यक्ष सोमनाथ खंडागळे व दयावान ग्रुप अकलूज शहरचे सुधाकर बनसोडे , महेंद्रसिंग साठे यांनी दै. कटुसत्यशी बोलताना दिली.  पुढे बोलताना ते म्हणाले की,  राज्यस्तरीय आदर्श कला क्रीडा व सामाजिक विशेष शिक्षक पुरस्कार २२ डिसेंबर रोजी अकलूज ग्रामपंचायत येथील सभागृहात वितरण करण्यात येणार आहेत. सदर पुरस्काराचे मानकरी अण्णाराव खंडागळे ,माढा(आदर्श कला शिक्षक) सोजर मस्के मोहळ(आदर्श शिक्षक) अशोक वामन कोर्टिकर पंढरपूर(सामाजिक आदर्श शिक्षक) करुणा मधुकर धाईजे माळशिरस (आदर्श क्रीडा शिक्षक) राहुल सुरेश चव्हाण करमाळा(विशेष पुरस्कार) पांडुरंग भानुदास जाधव दौड(विशेषपुरस्कार).सीताराम विठ्ठल रणदिवे तुंगत (विशेष पुरस्कार)यांना त्यांच्या कार्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल देण्यात येणार असून,शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील , माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, शितलदेवी मोहिते पाटील सदस्या जिल्हा परिषद सोलापूर, धनंजयभाऊ देशमुख उपसरपंच अकलूज,अर्जुनसिंह मोहिते पाटील सदस्य पंचायत समिती ,वैष्णवी देवी मोहिते पाटील सभापती पंचायत समिती, शिवतेजसिंह मोहिते पाटील सरपंच ग्रामपंचायत अकलूज हसीना शेख सदस्या पंचायत समिती  फातिमा पाटावला मा.सदस्या पंचायत समिती  हेमलता चांडॊले सदस्या पंचायत समिती यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages