मोहोळ तालुका मतदार आभार दौरा.
मोहोळ प्रतिनिधी - मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार यशवंत माने हे प्रचंड मताने विजयी झाले याबद्दल मतदारांचे आभार मानने व अडी अडचणी जाणून घेण्यासाठी मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते राजनजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार यशवंत माने यांचे प्रमुख उपस्थितीत दौरा आज वरकुटे येथे पार पडला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ताअध्यक्ष प्रकाश चवरे,जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे,रवि पाचपुंड बाजार समिती चे माजी संचालक सुधीर बसाटे माजी सरपंच रामचंद्र पाटील,दत्तात्रय बचुटे माजी सरपंच बबन भुसे वरकुटे सोसायटीचे माजी चेअरमन बळीराम भुसे चिंतू पाटील,वरकुटे सोसायटी चे चेअरमन सिध्देश्वर बचुटे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे,उपसरपंच आनंद डोंगरे आदी उपस्थित होते.
माजी आमदार राजनजी पाटील यांनी उपस्थितीत व मतदाराचे मताधिक्य दिले बद्दल आभार मानले व शेतकरी ग्रामस्थ यांना आपल्या अडीअडचणी विषयी माहिती विचारले उपस्थित ग्रामस्थांनी उजनी धरण हे पूर्ण भरले असून या धरणावर असणाऱ्या कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व शेतीसाठी पिण्यासाठी उन्हाळ्यात देखील पाणी मिळावे अशी प्रमुख मागणी केली,यावर राजन पाटील यांनी शेतकऱ्यांना विश्वास देऊन सागितले की उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असले तरी आमदार यशवंत माने हे येणाऱ्या अधिवेशन काळात कालवा समितीच्या बैठकीची मागणी करून सदर बैठकीमध्ये उजनी धरणाचे नियोजन व कालव्याला उजनी कॅनालमधुन शेती साठी व्यवस्थित नियोजन करुन पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करतील असे अभिवचन दिले.
या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील दत्तात्रय पाटील पांडुरंग बसाटे,ज्ञानेश्वर लोंढे मधुकर काशीद,विष्णू पाटील,बाळू पाटील,संतोष भुसे तानाजी बचुटे,बाळु बचुटे,सुहास बसाटे,सुनील बचुटे,सदाशिव हजारे,राम काशीद,ग्रामपंचायत सदस्य नागनाथ गवळी बंडु बसाटे,विजय डोंगरे,प्रगतशील बागातदार नामदेव बचुटे,नागेश बसाटे,मारुती शिंदे,आनंद बचुटे सह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इन्कम टॅक्स विभागातून एकतीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले श्री विलास बाळकृष्ण बसाटे यांचा यावेळी सेवानिवृत्ती बद्दल आमदार राजनजी पाटील व आमदार यशवंत माने यांच्या शुभहस्ते वरकुटे ग्रामस्थांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत बचुटे,जय हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष मोहन बसाटे सचिन बसाटे,नेताजी बचुटे,अमोल बसाटे,रंगनाथ बचुटे,अक्षय गवळी विजय बचुटे,काका बचुटे,अमोल बचुटे,अनिल बचुटे नवनाथ बचुटे प्रदीप बचुटे निखील बचुटे अविनाश सोलंकर जावेद मणेरी आदींनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेखर बसाटे यांनी तर सूत्रसंचालन व आभ हरिदास बंडगर गुरुजी यांनी केले आभार यांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment