एमकेसीएलकडून आयआयटी कॅम्प्युटर सेंटरचा गौरव
पंढरपूर : येथील अरबुज मेन्शन, स्टेशन रोड येथील आयआयटी कम्प्युटर सेंटरला सर्वोत्कृष्ठ संगणक संस्थेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांची विभागीय मीटिंग २०१९ निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे संपन्न झाली. एमएस-सीआयटी , क्लिक कोर्सेस , क्लिक इंग्लिश या सर्व कोर्सेस मध्ये सर्वाधिक प्रवेश नोंदविलेबद्दल महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते नितिन आसबे यांना पारितोषिक व वेबकॅमेरा देवून सन्मानित करण्यात आले. गेल्या २० वर्षांपासून पंढरपूर तालुक्यातील आयआयटी ही संस्था विद्यार्थांना संगणक साक्षर करण्याचे कार्य यशस्वीरित्या करीत आहे. या पूर्वीही अनेक पुरस्कार या संस्थेला मिळाले आहेत. पाच संगणकापासून आज ५० संगणकापर्यंतची लॅब आयआयटी संस्थेने उभारली आहे. यावेळी विभागीय सरव्यवस्थापक अतुल पतोडी, महेश पत्रिके, रोहित जेऊरकर, हारून शेख, मलिक शेख व सोलापूर जिल्हयातिल सर्व संगणक संस्थाचालक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment