चायत समिती माणगाव व ग्रुप ग्रामपंचायत भागाड यांचे संयुक्त विद्यमाने श्रमदानातून तासगांव येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 12, 2019

चायत समिती माणगाव व ग्रुप ग्रामपंचायत भागाड यांचे संयुक्त विद्यमाने श्रमदानातून तासगांव येथे वनराई बंधारा बांधण्यात आला.







चायत समिती माणगाव व ग्रुप ग्रामपंचायत भागाड यांचे संयुक्त विद्यमाने श्रमदानातून तासगांव येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. 
            बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )  ग्रुप ग्रामपंचायत भागाड येथील तासगाव हद्दीतील फरशी येथील नदीवर  गटविकास अधिकारी श्री.    
सतिश गाढवे यांच्या प्रमुख सक्रीय उपस्थितीत आणि त्यांच्या कौशल्यपूर्ण मार्गदर्शनाखाली  पंचायत समिती माणगाव  येथील अधिकारी वर्ग, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष श्रमदानातून ५०० सिमेंटच्या पिशव्यांचा वनराई बंधारा बांधण्यात आला. 
       सदर बंधाऱ्याचे पाणी माहे एप्रिल अखेरपर्यंत राहत असलेमुळे येथील गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच एप्रिल अखेर बंधाऱ्याच्या सांडवा बंद करण्याचे नियोजन करून या बंधाऱ्यातील  पाणी मे अखेरपर्यंत साठवून ठेवण्याचे प्रयोजन केले आहे. 
       सदर वनराई बंधाऱ्याच्या कामा करिता श्री.सतीश गाढवे साहेब, मा.गट विकास अधिकारी  पंचायत समिती माणगाव ,श्री. काप, श्री. कटरे ,कृषी अधिकारी ,श्री. गायकवाड, मराठे, मिंडे, लवटे इत्यादी विस्तार अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages