दत्त प्राथमिक विद्यामंदिर व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथे माता पालक मेळावा संपन्न
दि:-१३/१२/२०१९ वार शुक्रवार रोजी दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी या दोन्ही शाळेत माता पालक मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक .सादिक बागवान सर तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती क्रीडा,शिक्षण व समाजसेवी संस्था,उपळाई(ठोंगे) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन (आण्णा) ठोंगे,प्रमुख उपस्थिती म्हणून दिलीपराव सोपल प्रशालेच्या मुख्याध्यापक .चंद्रकांत लोखंडे उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली जेष्ठ माता पालक व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले 0विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत तसेच गुणवत्तेबाबत , आरोग्याबाबत , मातापालकांशी सुसंवाद साधण्यात आला.आपल्या पाल्याच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी शिक्षकांना पालकांनी सहकार्य करावे ही अपेक्षा शाळेकडून व्यक्त करण्यात आली.मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत , विषाणूजन्य आजारापासून पाल्याचा बाचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत ,इयत्ता ५वी शिष्यवृत्ती बाबत- युवराज जगताप सर, .सुनील लंगोट सर,अरुणा मठपती मॅडम, सादिक बागवान सर, मोहन (आण्णा)ठोंगे सर यांनी पालकांना मार्गदर्शन केले. अप्रगत,अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी (१ली ते १० वी )रोज शाळेच्या वेळेपूर्वी मोफत जादा तास शाळेत घेतले जातात याचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन (आण्णा) ठोंगे सर यांनी केले
सदर कार्यक्रमास श्री.युवराज जगताप सर, सुनील लंगोटे , श्रीकांत कुंभारे , .संगीता काळे मॅडम ,.सचिन काळे , राहुल ठोंगे , संतोष ठोंबरे , विलंबिनी पवार मॅडम व सेवक दत्ता ठोंगे,संदीप भोरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुणा मठपती मॅडम यांनी तर आभार मंगेश मोरे सर यांनी केले
No comments:
Post a Comment