ग्रामपंचायत वाणीचिंचाळे सरपंचपदी नंदाबाई तुकाराम झाडबुके यांची बिनविरोध निवड.
वाणीचिंचाळे - वाणीचिंचाळे ग्रामपंचायत निवडणूक 2019 या वर्षासाठी सरपंच पदाच्या निवडणुकीत मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे खंदे समर्थक नंदाबाई तुकाराम झाडबुके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज झालेली निवड ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. निवड प्रक्रिया दुपारी बारा वाजता अर्ज स्वीकारणे व दोन वाजता निवडणूक निकाल जाहीर करणे या पद्धतीने होते परंतु दोन वाजेपर्यंत कोणत्याही उमेदवारांनी अर्ज भरला नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सदर निवड बिनविरोध म्हणून जाहीर केली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्कल उगले यांनी तर साळुंखे भाऊसाहेब यांनी मदत करण्याचे काम केले.
निवड जाहीर होताच शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच गुलालाची मुक्तपणे उधळण केली.
यावेळी नुतन सरपंचांचा सत्कार माजी सरपंच रतनबाई पाटील यांनी केला तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनीही त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हनुमान मंदिरामध्ये विजय सभाही घेण्यात आली यावेळी सर्व कार्यकर्त्यांचा तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांचा नूतन सरपंचाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिस प्रशासनाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकरराव गडहिरे यांनी केले तसेच नवीन सरपंंचानी गावाचा विकास करून सरपंच पदाला न्याय दयावा असे सांगितले.
तसेच या सत्काराला उत्तर देताना गावात चौफेर विकास करु असे आश्वासन दिले.
यावेळी गावातील अनेक आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने चंदनशिवे व पठाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

No comments:
Post a Comment