मोहोळमध्ये खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 13, 2019

मोहोळमध्ये खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम.






मोहोळमध्ये खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम.

मोहोळ,प्रतिनिधी

सध्या महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात महत्व प्राप्त
होण्यापाठीमागे पवार साहेबांचे महत्वाचे योगदान असून त्यांनी "समान संधी समान सत्ता" देऊन ५० टक्के आरक्षण दिले.स्त्रीवर्गाला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय नेतृत्व देण्याची आणि स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान घालविण्याची भुमिका घेतली.यामुळेच आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे मत मोहोळ तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्ष अविना राठोड़ यांनी केले.

 मोहोळ राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस च्या वतीने माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार याचा वाढदिवस विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला.यावेळी
मोहोळ मधील विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या महिलांचा सत्कार मोहोळ तालुका युवती तालुकाध्यक्ष अविना राठोड़ यांच्या वतीने व शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला तालुका उपाध्यक्ष लता पाटील ह्या होत्या.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना खंदारे उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages