भुयारी गटार योजनेच्या संदर्भात घेतली नगरपालिकेत पत्रकार परिषद
बार्शी प्रतिनिधी -
बार्शी शहरातील भुयारी गटारीचे काम अंतिम टप्प्यांत आले असून येत्या 2 ते 3 महिन्यांत शहरातील सर्व रस्ते डांबरीकरण
होतील. कामे मंजूर आहेत, निधी शिल्लक आहे. विकासकामांना नागरिकांनी सहकार्य करावे. चुका,अडचणी, त्रास व आपल्या समस्यां असेल तर मला किंवा नगराध्यक्षांना त्वरीत फोन करा असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी
पत्रकार परिषदेत केले.राज्यात ४० शहरांत भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे.ही योजना शासनाकडून सक्तीची
आहे. योजना राबवली नाही तर रो वॉटरकडून महिन्याला दीड लाख तर हरित लवादकडून वर्षाला १० लाख रुपये दंड पालिकेला होणार होता. त्यामुळे योजना राबवली आहे.
सध्या शहराचे तीन झोन केले आहेत पहिल्या टप्यांत भुयारी गटार योजनेचे काम दोन झोनमध्ये चालू असून ११५ किलोमीटरचे असून त्यापैकी ९५ किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. केवळ घरगुती जोडणी शिल्लक असून येत्या 1 ते 2 महिन्यात काम पूर्ण होईल. शहरातील अंतर्गत ९२ रस्त्यांच्या
वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत. येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामांना सुरवात होईल.विरोधक सोशल मीडियावर पोस्ट टाकून जनतेच्या भावना भडकावत आहेत. सर्व सत्ता आमच्या ताब्यात आहेत. जनतेने त्यांना विश्रांती दिली आहे. त्यामुळे त्यांना विकास कामे पहावत नाहीत. योजनेमुळे होणाऱ्या त्रासाला किंवा कामात सुचना करायच्या असतील तर नागरिकांनी संबधित ठेकेदार, अधिकारी,कर्मचारी सहकार्य करीत नसतील तर सरळ मला अथवा नगराध्यक्षांना फोन करून तक्रार करा, त्वरीत अंमलबजावणी होईल असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.या वेळी नगराध्यक्ष अॅड.असिफ तांबोळी, पक्षनेते विजय राऊत, दिपक राऊत, पाणी पुरवठा सभापती भैय्या बारंगुळे,मुख्याधिकारी शिवाजी गवळी, ठेकेदार खिल्लारी एन्टरप्राईजेसचे व्यवस्थापक रेड्डी, जलदाय अभियंता अजय होनखांबे, करळे, दिलीप खोडके आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment