महात्मा फुले समता गौरव पुरस्कार जाहीर! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 11, 2019

महात्मा फुले समता गौरव पुरस्कार जाहीर!



















महात्मा फुले समता गौरव पुरस्कार जाहीर!
१४ डिसेंबर रोजी वितरण; आ.भालके, आ.माने यांचा सत्कार!
फुलचिंचोली(प्रतिनिधी)अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली यांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या 'समता गौरव'पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी सायं.६.३०मि. पुरस्कार वितरण व नूतन आमदार भारत भालके व मोहोळचे आमदार यशवंत माने यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी दिली.
       यावर्षी सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार संतोष राजगुरू, पत्रकारिता HPN चॅनेलचे संपादक नागेश सुतार,कला महात्मा फुले यांच्या जीवनावरील नाटक करणारे अभिनेते कुमार आहेर,साहित्य सौ.विमल माळी, कृषी नागनाथ माळी,शैक्षणिक सौ. माधुरी शेंडे यांना २०१९ चा समता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै पंढरीभूषणचे संपादक शिवाजी शिंदे हे असून, यावेळी बीड जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत,प्रदेशपाध्यक्ष के.एस.माळी,जयंत भंडारे,बाळासाहेब माळी,दत्तात्रय घाडगे,रघुनाथ ढोक,जिल्हाध्यक्ष हरिभाऊ गावधरे,आबा खारे,किशोर माळी, अनिल अभंगराव,दिलिप भुजबळ जि प सदस्य सोनवणे सर,मुबिना मुलाणी,माऊली चव्हाण आदीसह समता परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages