अकोले (खुर्द ) येथील विद्यालयात बाजार दिवस साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 11, 2019

अकोले (खुर्द ) येथील विद्यालयात बाजार दिवस साजरा













अकोले (खुर्द ) येथील विद्यालयात बाजार दिवस साजरा


  टेंभुर्णी  (प्रतिनिधी)  मंगळवार दि .  १० डिसेंबर २०१९ रोजी  सकाळी १०ते दुपारी २ या वेळेतअकोले ( खुर्द ) येथील यशवंत प्राथमिक विद्यामंदीर व मा . बबनरावजी शिंदे माध्य . व कला , विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आठवडी बाजाराचे उद्घघाटन  अकोले ( खु . )व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक  यांचे हस्ते करण्यात आले. 
          यावेळी संस्थेचे सचिव तथा प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे सर, यशवंत प्राथमिक विद्यामंदीर च्या मुख्याध्यापिका सौ . अर्चना नेवसे मॅडम तसेच अकोले आणि अकोले (खुर्द ) परिसरातून आलेले माजी विद्यार्थी , विद्यार्थी पालक , व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
           विद्यार्थ्यांना खरेदी व विक्रीचे कौशल्यप्राप्त होण्यासाठी प्रशालेने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आठवडा बाजाराचे आयोजन केले होते .  बाजारामध्ये विविध स्टॉलचे  व्यवस्थित नियोजन करून खाऊगल्ली विभाग , भाजीपाला विभाग , मनोरंजन विभाग असे वर्गीकरण करुन नेहमीप्रमाणे शाळा भरवून विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना वेळ निश्चित करून बाजार करण्यासाठी सोडले होते . दोनशे विद्यार्थी यांनी विक्रेत्याची भूमिका बजावली व शिक्षकांनी विद्यार्थी यांचे खरेदी विक्री कौशल्य यांची नोंद करुन घेतली . खाऊगल्ली हाऊसफूल राहिली तर भाजीपाला काही तासातच संपला . मान्यवरांनी व ग्रामस्थ , तसेच विद्यार्थी ,पालक यांनी बाजाराचा मनसोक्त आनंद घेतला . एक लाखाची उलाढाल शाळेच्या आठवडा बाजारामध्ये झाली .
        आठवडा बाजार यशस्वी होण्यासाठी अकोले ( खुर्द ) चे यशवंत प्राथमिक विद्यामंदीर च्या मुख्याध्यापिका व मा .बबनरावजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य , प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक -शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
     आठवडा बाजारात खरेदी करण्यासठी अकोले ( खुर्द ) व पंचक्रोशीतून प्रतिष्ठीत मान्यवर , पालक , शिक्षक -शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी ,माजी विद्यार्थी तसेच प्रशालेतील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते...
Attachments area

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages