तन खाई धन,याविषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 20, 2019

तन खाई धन,याविषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

                        



तन खाई धन,याविषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न  

कुर्डुवाडी-प्रतिनिधी.एफ.एम.सी.कंपनीच्या वतीने,बारलोणी ता.माढा या गांवात ऊस तण नियंञक याविषयी शिबिर घेण्यात आले.या मार्गदर्शन-मेळावा कार्यक्रमास शेतकरी,ग्रामस्थ,ऊसउत्पादक याःना उद्देशून,सोलापूर-बारामती विभाग प्रमुख-सतिश होळकर यांनी विविध तणांविषयी मार्गदर्शन केले. शेतकरी मेळाव्यात पुढे बोलताना म्हणाले की,या पृथ्वीवर शेतकरी बांधव घेत असलेल्या विविध पिकांच्या, अगोदर पासूनच विविध प्रकारच्या तनाचे वास्तव्य आहे.त्यामुळेच ही तणे मुख्य पिकांपेक्षा अधिक पटिने जास्त उगवून पिकांची अन्नद्रव्ये खाण्याची स्पर्धा करतात.  यावर मात करण्याबरोबरच चांगल्या ऊसपिकासाठी एफएमसी कंपनीने अॕथोरीनेक्ट हे तणनाशक बाजारात उपलब्ध झाल्याची माहिती दिली. याप्रसंगी विनोद कुंभार,माजी.प.सं.सभापती सुरेश बागल,सरपंच-संजय लोंढे,व्यंकटेश पाटिल,सोपान चव्हाण आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages