जिव्हाळा विद्यामंदिरात वार्षिक क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 20, 2019

जिव्हाळा विद्यामंदिरात वार्षिक क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण.






जिव्हाळा  विद्यामंदिरात वार्षिक क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण.                             
     राष्ट्रीय शालेय स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त संजीवनी ढाणे हिचा  केला सन्मान.   विविध खेळात प्राविण्य धारकांना वितरित केले 270 पदक.                             
कुर्डुवाडी-प्रतिनिधी.  सालाबाद प्रमाणे याहीवर्षी जिव्हाळा सुसंस्कार विद्यामंदिर, कुर्डूवाडी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
       प्रारंभी संस्थापक अध्यक्ष शिवराज वायचळ,मुख्याध्यापिका  सारिका गोटे, प्रमुख अतिथी अण्णासाहेब ढाणे,(वस्ताद) कैलास जाधव (क्रिडा प्रबोधनी पुणे) साई गायकवाड, फिरोज खान यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलित करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .
      त्यानंतर विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक व सांघिक खेळात विशेष प्राविण्य मिळवलेल्या सर्व गटातील सुमारे 270 विद्यार्थ्यांना गोल्ड ,सिल्वर ,रौप्यपदक तसेच प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले .
 यानंतर प्रत्येक वर्गातील आदर्श व गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी खेळाडू यांना सन्मानित करण्यात आले.  संपूर्ण विद्यालयातून आदर्श उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्ञानेश्वर उबाळे व साक्षी लोंढे या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह- प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
       या नंतर अण्णासाहेब ढाणे(वस्ताद)यांनी कुस्ती खेळाविषयी माहिती दिली.   याप्रसंगी मुख्याध्यापिका- सारिका गोटे,सचिव-अजित वायचळ,रवी शहा,किशोर मोहोले,जयंत माळी,आकाश घोडके,प्रदीप देशपांडे, नवनाथ बुरकुले,श्याम शिंदे, मंगेश लचके, प्रशांत चोपडे ,कृष्णा कोकाटे, दिनेश आतकर ,गीतांजली शिंदे, सोनाली धुमाळ, निलोफर सय्यद आदींसह पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक जयंत माळी यांनी केले तर, आभार आकाश घोडके यांनी मांडले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages