सहकार महर्षी च्या १ लाख ५५ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 20, 2019

सहकार महर्षी च्या १ लाख ५५ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन...



सहकार महर्षी च्या १ लाख ५५ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन...


                                    चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले
अकलूज( प्रतिनिधी) येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१९-२०२०  च्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या एक लाख ५५ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे विद्यमान चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
         कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. कारखान्याचा सिझन२०१९- २०२०  ऊस गळीत हंगाम दिनांक २४ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरू झाला असून १७ डिसेंबर २०१९ अखेर एक लाख६७  हजार ६१५ मे टन उसाचे गाळप होऊन एक लाख ५६ हजार १५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झालेले असून सरासरी साखर उतारा ९. ६४% व आजचा साखर उतारा १०.९  टक्के आहे सध्या प्रति दिन ७५०० होत आहे तसेच कॉजनरेशन प्रकल्पामध्ये २४ नोव्हेंबर २०१९ पासून १७ डिसेंबर २०१९ पर्यंत एक कोटी ३७ लाख ६३ हजार २८६ युनिट वीज निर्माण होऊन ८४ लाख २६ हजार ७४९ युनिट विक्री केलेली आहे तसेच चालू सीझनमध्ये उपपदार्थ प्रकल्पातील दिसणारे मध्ये १६ डिसेंबर अखेर ११ लाख ८३ हजार ४६४ लिटर रेक्टिफाइड स्पिरिट तसेच सहा लाख ७१ हजार ४६० लिटर्स इथेनॉल नोंद उत्पादन झाले आहे  अशी माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली  साखर पूजनाचे कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील व कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी ,कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages