कुरणवाडी येथील रक्तदान शिबिरात १४२ रक्तदात्यांचा सहभाग
मोहोळ,प्रतिनिधी
ग्रामदैवत श्रीदत्त जयंती,मातोश्री लक्ष्मीबाई बाबुराव पाटील व अनिल केराप्पा मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १४२ रक्तत्यांनी आपला रक्तदानाचा सहभाग नोंदवला.या रक्तदान शिबिराचे उदघाटन लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच किसन गुंड हे होते. सध्याच्या काळात रुग्णांचे प्रमाण वाढत आहे वाहनांची संख्या वाढल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे परिणामी दवाखान्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान ही काळाची गरज बनली असल्याचे यावेळी बाराचे पाटील यांनी सांगितले.
यावेळी सरपंच सरपंच गणेश जाधव,माजी सरपंच सज्जन खोत,त्रिमूर्ती ॲग्रो सेलचे सुनील मोरे, लोकनेते शुगर चे पुरवठा अधिकारी नेताजी बोडके लोकनेते शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन रणजीत थिटे,अमोल गायकवाड,भास्कर गुंड,सर्जेराव मोरे, रामेश्वर बोडके,हर्षल सालगुडे,बाबासाहेब गुंड,महादेव गुंड,मारुती यादव आदीसह कुरणवाडी येथील नागरिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment