कला व वाणिज्य महाविद्यालय माढा आणि तालुका विधी सेवा समिती माढा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता अंतर्गत न्यायालय भेटीचे आयोजन करण्यात आले होते. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 14, 2019

कला व वाणिज्य महाविद्यालय माढा आणि तालुका विधी सेवा समिती माढा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता अंतर्गत न्यायालय भेटीचे आयोजन करण्यात आले होते.








कला व वाणिज्य महाविद्यालय माढा आणि तालुका विधी सेवा समिती माढा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता अंतर्गत न्यायालय भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी दिवाणी   न्यायाधीश एम एस काझी यांनी मार्गदर्शन केले न्या. काझी म्हणाले माढा न्यायालयाची स्थापना सन 1884 मध्ये झाली आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या न्यायालयात आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. ते पुढे म्हणाले भारतातील न्यायालयात तीन कोटीहून अधिक खटले प्रलंबित आहेत त्यामुळे न्यायव्यवस्थेवर खटल्यांचा ताण पडत आहे. असे असले तरी न्यायाधीश हे सचोटीने व प्रामाणिकपणे न्यायालयीन खटले निकाली काढत आहेत. अमेरिकेच्या तुलनेत भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अठरा पटीने अधिक न्यायनिवाडे करतात. त्यांनी समाजातील स्त्रियांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराकडेही लक्ष वेधले स्त्री अत्याचारा बाबत आपण पुरुषप्रधान चौकटीतून केलेले कसलेही समर्थन योग्य ठरत नाही ते समतेच्या तत्वाला बाधक असून न्याय्य ठरू शकत नाही या वाढत्या अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी युवकांना मूल्य शिक्षणाबरोबरच नैतिक व सुसंस्कृत शिक्षण देण्याची गरज आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्या. एस एस सय्यद हे होते न्या. सय्यद म्हणाले विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजाची माहिती झाल्यामुळे न्याय व्यवस्थेबाबत असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी न्यायालयीन कामकाजाची ची पाहणी करणे फायद्याचे आहे यावेळी न्या. ए आर सय्यद आणि न्या ए टी गीत्ते, आदि न्यायाधीश उपस्थित होते यावेळी बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड.एस आर राजमाने, सचिव अॅड. पाटील, अॅड सचिन गायकवाड, डॉ नंदकुमार घोळवे, डॉ. संतोष राजगुरू व व सेवक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष  सह सरकारी वकील अॅड. सक्रे यांनी केले डॉ. सुशील शिंदे यांनी प्रस्ताविक केले अॅड. वर्षा गायकवाड यांनी विधी साक्षरते बाबत मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages