राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
फ्लेक्सचा खर्च टाळून शेतकरी कुटुंबियांना मदत व्हावी याकरिता
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवाजीनगर मतदार संघाचे ओ बी सी सेलच्यावतीने
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टला दहा हजारची आर्थिक मदत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष , माजी केंद्रीय कृषिमंत्री व लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवाजीनगर मतदार संघाचे ओ बी सी सेलच्यावतीने फ्लेक्सचा खर्च टाळून शेतकरी कुटुंबियांना मदत व्हावी याकरिता राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टला दहा हजारची आर्थिक मदत करण्यात आली . या मदतीचा धनादेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवाजीनगर मतदार संघाचे ओ बी सी सेलचे अध्यक्ष गोविंद पवार यांच्याहस्ते पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती पोकळे याना सुपूर्त करण्यात आला .
घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश घुले , प्रदीप देशमुख , माजी नगरसेवक निलेश निकम , माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके ,पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा मृणालिनी वाणी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवाजीनगर मतदार संघाचे ओ बी सी सेलच्या महिला अध्यक्षा अनिता पवार आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवाजीनगर मतदार संघाचे ओ बी सी सेलचे अध्यक्ष गोविंद पवार , कार्याध्यक्ष दशरथ क्षेत्री , ब्लॉक अध्यक्ष महेंद्र गायकवाड ,ब्लॉक उपाध्यक्ष प्रसाद मुंडे , मनिषा ठोसर , संगीता पवार , पूजा पवार , ज्योती गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले .

No comments:
Post a Comment