राज्यपाल व मुख्य सचिव यांच्या आदेशाने जि.प.मुख्य अधिकारी वायचळ यांनी गारआकोले येथिल भ्रष्टाचाराची केली फेर चौकशी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 21, 2019

राज्यपाल व मुख्य सचिव यांच्या आदेशाने जि.प.मुख्य अधिकारी वायचळ यांनी गारआकोले येथिल भ्रष्टाचाराची केली फेर चौकशी

राज्यपाल व मुख्य सचिव यांच्या आदेशाने जि.प.मुख्य अधिकारी वायचळ  यांनी गारआकोले येथिल भ्रष्टाचाराची केली फेर चौकशी


टेंभुर्णी  (प्रतिनिधी )   गारआकोले येथिल विविध विकासकामामध्ये झालेली अ नियमित्ता व भ्रष्टाचाराची चौकशी उपकार्यकारी अधिकारी श्रीमती  चंचला पाटिल यांच्या मार्फत चौकशी झाली होती परंतु सदर चौकशी अहवालामध्ये डेप्युटी शिवो चंचला पाटिल यांनी भ्रष्टाचारांना पाठीशी घातल्याने गारआकोले चे युवक समाधान बबन केचे व ईतर तक्रार दारांना हा आहवाल मान्य न झाल्याने त्यांनी या भ्रष्टाचाराची फेर चौकशी व्हावी अशी मागणी मा.राज्यपाल व मुख्य सचिवांनकडे केली होती त्यांची मागणी मान्य करुण मा.राज्यपाल महोद्यांनी व मुख्य सचिवांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फेर चौकशीचे आदेश दिले होते या आदेशा प्रमाने मुख्य कार्यकारी आधिकारी  प्रकाश वायचळ यांनी मंगळवार
दि.19/11/2019 रोजी सकाळी 12 वाजण्याच्या दरम्यान  प्रत्यक्ष  आपल्या ताफ्यासह पहाणी केली असता सदर कामात आनियमित्ता अढळून आल्याने मुख्या कार्यकारी आधिकारी या प्रकरणावर काय कारवाई काय  करणार या कडे गारआकोले ग्रामस्थांनचे   लक्ष लागून राहीले आहे

 माढातालुक्यातील भिमानदीच्या काटावर असलेले गारआकोले येथिल पाण्याची टाकी स्मशानभूमी अंतर्गत रस्ते ,श्री स्वामी महाराज  मंदिर येथिल       शौचायल व   वाहणतळ    या कामान मध्ये   हजारो रुपायांचा  भ्रष्टाचार झाला असुन  हे  काम झाल्या पासुन या सगळ्या गोष्टी ग्रामस्थांना वापरन्यास अयोग्य व निकृष्ट असल्याने शासनाचा लाखोरुपांयांचा निधी आधिकार्यांच्या व ग्रामसेवक यांच्या चुकीमुळे  वाया गेला. असुन या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे अशी तक्रार गारआकोले ग्रामस्थांनी व समाधान केचे यांनी  मुख्यमंत्री मुख्य सचिव राज्यपाल यांच्याकङे निवेदना द्वारे करुण वेळोवेळी चौकशीची मागणी केली होती त्याची दखल घेऊन उपकार्यकारी अधिकारी श्रीमती चंचला पाटिल यांच्या कडून चौकशी झाली होती परंतु यात  विस्तार आधिकारी व गारआकोले ग्रामसेवक सरडे  यांनी चंचला पाटिल यांची चुकीची माहीती सांगून दिशाभूल केल्याने व     सर्व भ्रष्टाचारास पाठीशी घातल्याने पुन्हा समाधान केचे यांनी फेर चौकशी साठी राज्यपाल समोर उपोषण धरण्याची ईशारा दिल्याने  राज्यपाल सचिव आदेशाने  फेर  चौकशीचे आदेश देऊन  फेर चौकशी टेंभुर्णी  पोलिस बंदोबस्तात मुख्य अधिकारी वायचळ यांनी  सलग तीन तास गारआकोले येथिल  प्रतेक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पहाणी  करण्यात आली .असुन या वेळी जि.प. उपअधिकारी   श्रीमती चंचला पाटील   कुर्डूवाडी पंचायत समिती विस्तार  आधिकारी   भारत रेपाळ, ग्रामसेवक  सरडे, सरपंच प्रतिनिधी मानीक पवार, माजी  सरपंच जितेद्र गायकवाड ,तक्रार दार समाधान केचे ,नंदु पवार आशोक निकम संपत पवार विनायक केचे व गोविंद भाऊ पवार  दत्तात्रे भोसले,सोमनाथ निकम,  व ग्रामस्थ उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages