अकलूजमध्ये टीपू सुल्तान यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्याचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 23, 2019

अकलूजमध्ये टीपू सुल्तान यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्याचे वाटप

अकलूजमध्ये टीपू सुल्तान यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्याचे वाटप

प्रतिनिधी- [अकलूज] शेर ए म्हैसूर , भारताचे पहिले स्वतंत्र सैनिक ,प्रथम मिसाईल मॅन शहिद हजरत टीपू सुल्तान यांच्या 269 व्या जयंतीनिमित्त अकलूज शहरातील राऊतनगर येथे  मियां भाई ग्रुपचे अध्यक्ष जानिसार मुलाणी यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर  वाटप करण्यात आले. 
      यावेळी कार्यक्रमांचे प्रमुख वक्ता ,एम.आय.एम. तालुकाध्यक्ष मोहसिन शेख यांनी टीपू सुल्तान यांच्या शौर्यगाथा ,कुशल प्रशासक आणि इंग्रजांविरुद्ध पुकारलेला बंड याविषयावर उजाळा देत लहान विद्यार्थ्यांना पराक्रमाचे धडे दिले.
 तसेच सालाबाद प्रमाणे टीपू सुल्तान यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकसहभागातून शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेत जयंती साजरी केली जाते,असे शेख म्हणाले.
        भविष्यात युवा पिढीला  टीपू सुल्तान यांचा खरा इतिहास माहिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी लहानपणापासून महापुरूषांचे आत्मचरित्र पुस्तकाचे वाचन करून  कुशल विद्यार्थी घडवण्याचे कार्य हे गुरुजनांचे आहे व ते तुमच्या माध्यमातून घडवावे असे मत व्यक्त करून आयोजक जानिसार मुलाणी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .
     यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम.आय.एम. शहर उपाध्यक्ष फारूख शेख , एम.आय.एम.शहर संघटक इन्नूस सय्यद,आसिफ सय्यद,हुसेन शेख ,जिल्हा परिषदेचे शिक्षक,शिक्षिका आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages