बदलत्या जीवनशैलीमुळे मणका विकार वाढले आहेत : डॉ. सुधांशु कोठाडीया संगमेश्वर कॉलेजमध्ये मणका विकारावर व्याख्यान
सोलापूर (प्रतिनिधी) 'बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वच क्षेत्रातील नोकरदार यांमध्ये मणक्याचे विकार वाढलेले आहेत. त्यासाठी आपण आपल्या दैनंदिन कामाचे योग्य नियोजन करून आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे' असे प्रतिपादन डॉक्टर सुधांशु कोठाडीया यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेजमध्ये मणका विकारावरील व्याख्यानात बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर शोभा राजमान्य होत्या.
प्रारंभी कॉलेजच्या वतीने डॉक्टर कोठाडीया यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी स्लाईड शोच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले." मणका विकारात - गॅप पडणे, चक्कर येणे, डाव्या हाताला मुंग्या येणे, कंबर दुखी, पायात गोळे येणे यासारखे आजार बळावतात. या सगळ्याच्या मुळाशी गेल्यानंतर लक्षात येते की,आपण आपल्या शरीराकडे वेगवेगळ्या कारणांनी दुर्लक्ष करतो. त्यातून या विकारांत कडे मानवी शरीर झुकते. आपल्या अनेक असंबद्ध सवयीतून मणक्याचे आजार, पाठ दुखी असह्य करते. त्यासाठी आहार-विहार याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा ". असेही ते म्हणाले.
याप्रसंगी उपप्राचार्य डी. एम. मैत्री, डॉ. राजकुमार मोहरकर, डॉ. सुहास पुजारी, डॉ. ऋतुराज बुवा, डॉ. मंगलमूर्ती धोकटे,प्रा. अशोक माशाळे,डॉ.वंदना पुरोहित, डॉ. दिपाली करजगीकर, डॉ. गणेश मुडेगावकर, प्रा. विशाल जत्ती, प्रा. संतोष पवार, प्रा. नागेश कोल्हे, राहुल कराडे, सोमशेखर धडुते ,यांच्यासह संगमेश्वर शिक्षण संस्थेतील विद्यार्थी , शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment