सेवानिवृत्तीनंतर आयुष्य चांगले घालविले पाहिजे- स्वरूपाराणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 26, 2019

सेवानिवृत्तीनंतर आयुष्य चांगले घालविले पाहिजे- स्वरूपाराणी

सेवानिवृत्तीनंतर आयुष्य चांगले घालविले पाहिजे-  स्वरूपाराणी
अकलूज - (विलास गायकवाड) ईश्वर आपल्याला खूप   संधी देतो, त्या मिळालेल्या संधीचे सोने कसे करता येईल ते पहावे तर सेवानिवृत्ती नंतर आयुष्य चांगले घालविले पाहिजे असे प्रतिपादन अकलुज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्या तथा जि.प.सदस्या स्वंरुपाराणी मोहिते पाटील यांनी केले.         
           शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला शंकरनगर, येथील शिवप्रभा पाटील यांचा सेवानिवृती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात स्वरूपाराणी मोहिते पाटील बोलत होत्या.
       प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात स्वागत गिताने व माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महषीँ व आक्कासाहेब व सरस्वती च्या पूजनाने करण्यात आली.यावेळी महषीँ प्रशालेचे सभापती अँड नितिनराव खराडे, नवनाथ पांढरे, मुख्यध्यापीका शयनाज शेख, बी. एन. एकतपूरेसर , शिवाजी पासरेसर, मंजुशा जैन , आदी उपस्थित होते.
       पुढे बोलताना मोहिते पाटील म्हणाल्या कि आई वडील आपल्याला प्रोत्साहन देतात, त्यांची आपण सेवा केली पाहिजे.तर मुलां मुलींनी मोठी स्वप्नं पाहिली पाहिजेत.एकदा शिक्षक सेवानिवृत्त होत असेल तर निरोप समारंभ म्हणणे पेक्षा गौरव समारंभ म्हटले पाहिजे असे त्या म्हणाल्या.                                                    प्रास्तविक मुख्याध्यापिका शयनाज शेख यांनी केले. तर अँड नितिनराव खराडे, कुभांरसर, कु.हषँली नाईकनवरे, सावंत मँडम, डाँ सुरेश पाटील यांनी शिवप्रभा पाटील यांचेविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुञसंचालन दळवीसर यांनी केले तर आभार पाटीलसर यांनी मानले.कार्यक्रमास बी. टी. शिंदेसर,एस. एस . पाटील, व्ही .एल .काशीद सर यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages