उपमुख्यमंत्रिपदाचा अजित पवारांनी दिला राजीनामा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप केला आहे. तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, परंतु न्यायालयानं उद्या बहुमत सिद्ध करण्यास सांगितलेलं असताना अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने भाजप पडली तोंडावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत अजित पवार यांची मनधरणी सुरु होती. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तरी त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता, आपण राष्ट्रवादीसोबत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता. भाजपकडून घोडेबाजार होऊ नये आणि राष्ट्रपती राजवट हटवून त्वरित सरकार स्थापन करता यावे यासाठी केलेला हा डाव होता का अशी शंका उपस्थित होतेय. सध्या जरी चित्र स्पष्ट नसलं तरी येत्या काही दिवसातच समजेल कि हे बंड होते की शरद पवारांच्या पवारनीतीचा एक भाग.

No comments:
Post a Comment