ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा- शितलदेवी मोहीते पाटील
अकलुज ( प्रतिनिधी ) दि. सोलापुर जिल्ह्यात १०२९ ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतीमध्ये विविध पदावर काम करणाऱ्या आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांची संख्या २००० पेक्षा जास्त आहे. व आकृतीबंधाबाहेरील कर्मचाऱ्यांची संख्या ७०० ते ८०० च्या घरात आहे परंतु शासनाने घेतलेल्या शासन निर्णयाची ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही . १एप्रिल २००७ ते ३१ डिसेंबर २०१९ अखेर पर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्यांस रहाणीमानभत्ता फरक जवळ जवळ २ लाख ५२ हजार रु ग्रामपंचायतीकडुन येणे आहे परंतु ही रक्कम कर्मचाऱ्यांनी मागणी केल्यास वसुलीचे कारण सांगुन ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जात नाही किंवा कामावरून काढुन टाकण्याची भिती घालुन कर्मचाऱ्यावर दबाव टाकला जात आहे. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या इतर सेवा विषयक बाबी फार मोठ्या प्रमाणात प्रलंबीत ठेवल्या आहेत तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रजा, सुट्टया, देखील दिल्या जात नाहीत. कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके,प्रा.फंड, विमा या बाबी देखील अपुर्ण ठेवल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थीक नुकसान होत आहे तसेच शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परीषद सेवेत वर्ग ३ व ४ च्या पदावर १० % आरक्षण ठेवले आहे जिल्हा परीषदने क संवर्गातील ४१५ रिक्त पदे भरणेसाठी मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध झाली होती त्यानुसार कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लिपीक, विस्तार अधिकारी (सां) ही एकुण पदाच्या १० % पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वाटयास आली आहेत ती पदे तात्काळ भरावीत व इतर सेवा विषयक बाबी व अडीअडचणी व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत यासाठी जिल्हापरिपद सदस्या शितलदेवी मोहीते पाटील यांनी जिल्हापरीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ , सामान्य प्रशासनचे उपमुख कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, तसेच ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती चंचल पाटील यांच्याकडे लेखी निवेदन देवुन सोलापुर जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, कार्याध्यक्ष मोहन लामकाने, सरचिटणिस महादेव माळी, उपाध्यक्ष अनिल घंटे, मोहोळ तालुकाध्यक्ष पांडुरंग खरात, द. सोलापुर तालुकाध्यक्ष लक्ष्मण खरात ,उ. सोलापुर अध्यक्ष जीवन गुंड सचिव आप्पा उडानशिवे, माळशिरस तालुकाध्यक्ष नितीन सावंत सचिव प्रशांत रामभाऊ गरङ, बालाजी पवार , संतोष गायकवाड,इतर कर्मचारी बांधव मोठया संख्येने उपस्थीत होते.

No comments:
Post a Comment