युवा सेनेच्यावतीने मोहोळ,बार्शी आणि अक्कलकोट दुष्काळी दौरा ; नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन साधला संवाद
सोलापूर- ( प्रतिनिधी ) - अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शिवसेनेसह आता युवा सेनासुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहे. युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शनिवारी युवा सेनेचे राज्य विस्तारक विपुल पिंगळे आणि नितीन लांडगे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ,बार्शी आणि अक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी दौरा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला. सुमारे २५ हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. परतीच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना फटका बसल्याचे पंचनाम्यानंतर दिसून आले आहे.लाखो हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. राज्यात सत्ता त्रांगडे सुरु असतानाच युवासेनेच्यावतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार यु सेनेचे पदाधिकारी राज्यभर दुष्काळी दौरे करत आहेत. शनिवारी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या नुकसंग्रस पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचा दिलासा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर ,युवा सेनेचे संघटक संजय माशिळकर ,राज्य विस्तारक नितीन लांडगे ,जिल्हाप्रमुख महेश देशमुख,मनीष काळजे, युवा सैनिक विशाल पवार,आभा काशीद,लेखन शिंदे यांच्यासाठ स्थानिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही .शेतकरी हा देशाचा महत्वाचा कणा आहे. शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत. उन्हाळ्यात आणि आता पावसाळ्यातसुद्धा बळीराजाला ओला आणि सुका दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या अडचणीला धावून येणार आहे. दुष्काळात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच जनावरांना सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. आतासुद्धा शेजाऱ्यांच्या नुकसान झालेल्या करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्याचा सविस्तर अहवाल आल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी युवा सेना कटीबद्ध असल्याचे राज्य विस्तारक विपुल पिंगळे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment