सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व्यावसायिक शिबिरांचे आयोजन - स्वयंप्रभादेवी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 16, 2019

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व्यावसायिक शिबिरांचे आयोजन - स्वयंप्रभादेवी

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व्यावसायिक शिबिरांचे आयोजन - स्वयंप्रभादेवी




अकलूज: उद्योग महर्षी कै. उदयसिंह शंकरराव मोहिते - पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवशंकर बझार , श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्था व शिवकिर्ती महिला औद्योगिक सहकारी संस्था,अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशंकर बझार च्या चेअरमन स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते पाटील, शिवरत्न ग्रुप चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर किर्तीध्वजसिंह उदयसिंह मोहिते पाटील व अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विविध आकर्षक हेअर ॲक्सरीज, रुखवत केक  व बिस्किट बनविण्याचे मोफत प्रशिक्षण शिबिर दिनांक 13 /11 /2019 ते 14 /11 /2019 रोजी  अकलुज ग्रामपंचायत हॉल अकलूज  व  दिनांक  15 /11 /2019 रोजी  गणेश हॉल  श्रीपुर येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन   मा. प्रकाश वायचळ  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सोलापूर, मा.चंचला पाटील  उपमुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद,सोलापूर,  स्मिता पाटील  गटविकास अधिकारी,पंचायत समिती, माळशिरस, स्वयंप्रभादेवी  उदयसिंह मोहिते पाटील  चेअरमन, शिवशंकर बझार, शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील सरपंच,अकलुज ग्रामपंचायत यांच्या हस्ते  पार पडले  या प्रशिक्षण शिबिरात 350 महिलांनी सहभाग नोंदवला. या  शिबिरात विविध हेअर ॲक्सरीज प्रकारांमध्ये  वेणी  गजरा, हेअर ब्रोच, यु पिन,फ्लॉवर कोम, गुलाब हेअरपिन, मोती हेअर पिन, पेपर फ्लॉवर वेनी, फोम फ्लॉवर वेणी, हेड बँड, साडी बॅग, बॉक्स पॅकिंग, परडी, एंगेजमेंट रिंग प्लॅटर, साडी बॉक्स, थाली डेकोरेशन, डेकोरेटिव्ह कोयरी इत्यादी प्रकार अकलूज या ठिकाणी शिकविण्यात आले. तसेच  व्हॅनिला केक, गहू बिस्किट,  नाचणी बिस्कीट, बृजबेरी  बिस्किट, कोकोनट बिस्किट इ. प्रकार  श्रीपुर याठिकाणी  शिकविण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरा मध्ये पुण्याच्या प्रसिद्ध प्रशिक्षिका सौ. मीनलताई जाधव यांनी अतिशय सुटसुटीत, समजेल अशा भाषेमध्ये  प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शिवशंकर बझार च्या चेअरमन मा.स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते - पाटील यांनी बोलताना सांगितले की , सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आम्ही अशा विविध शिबिरांचे आयोजन करत असतो. याचा मुख्य उद्देश महिलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे रहावे. स्वावलंबी बनावे.आपला स्वतःचा व्यवसाय चालू करून आपली प्रगती करावी हा असतो. असे सांगून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी वैशाली कांडलकर,  रंजना असबे,  वैशाली कुलकर्णी, प्रभावती भोंगळे, संजय मुंडफने, सोमनाथ  मुंडफने, रमेश देवकर, आकाश गोदे, नितीन जाधव, बापू नाईकनवरे, सागर यादव, बजरंग भोसले, अण्णा जाधव व राजकुमार हाके इत्यादी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बापुराव भिंगारदिवे, संभाजीराव कांबळे व अभिजीत गायकवाड यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages