प्रा अशोक पाचकुडवे यांना राज्यस्तरीय पुरस्कार
मोहोळ,प्रतिनिधी
मोहोळ येथील राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेचे सह शिक्षक अशोक पाचकुडवे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व आल्पसंख्यांक शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.पुणे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सगळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर,शिक्षण उपसंचालक प्रवीण आहिरे,प्रशासन आधिकारी प्रशांत वडाडे,लेखधीकारी मोरवनकर,कृषीसंचालीका आश्विनी भोपळे,संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष गायकवाड,सचिव सत्यजीत जानराव,प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे,पुणे जिल्हा अध्यक्ष अशोक मोरे,बहुजन शिक्षक संघटनेचे प्रदेश आध्यक्ष आण्णासाहेब भालशंकर,राज्य सचिव बी जी गायकवाड आदि मान्यवरांच्या हस्ते अशोक पाचकुडवे यांचा शाल,सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उद्योजक किशोर सरदेसाई,निवृत बँक आधिकारी भुजंगराव पाचकुडवे,माजी पोलीस निरीक्षक बापुसाहेब मोहिते,सिनियर इंजिनीयर मोहन लंगर आदि मान्यवर उपस्थित होते.अशोक पाचकुडवे हे गेल्या १८ वर्षा पासून इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ येथे अद्यापनाचे कार्य करतात,त्यांचे सामजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यात ही चागले योगदान आहे.यापूर्वीही त्याना जिल्हास्तरीय व राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
प्रा पाचकुडवे यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष यशवंत गुंड,उपाध्यक्ष संतोष गायकवाड,सचिव तथा प्राचार्य सुधीर गायकवाड,खजिनदार जानु फाटे,चेअरमन रंभादेवी गुंड,विमल गायकवाड,सचीन गायकवाड,डी डी व्हनकळस,पी जी राजमाने यांच्यासह शिक्षक,विध्यार्थी व पालक यानी त्यांचे आभिनंदन केले,
फोटो

No comments:
Post a Comment