- Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 7, 2019

महामार्गावरुन प्रवास...तर  FASTag हवाच...

एक डिसेंबर पासून पथकर नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही

सोलापूरदि - राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना आता चारचाकी वाहनांना FASTag बसवणे अनिवार्य आहे.  कारण पथकर नाक्यावर एक डिसेंबर २०१९ पासून रोख रक्कमेच्या माध्यमातून पथकर स्वीकारला जाणार नाहीतरी चारचाकी आणि त्यापुढील वाहनधारकांनी FASTag बसवून घ्यावे,असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सन २०१६ पासून FASTag electronic toll collection system सुरु केली आहेत्यानुसार  मे  २०१८ रोजी केंद्र सरकारने याबाबतचे राजपत्रही जाहीर केले आहेत्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहेअसे श्रीकदम यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.कदम यांनी नमूद केले आहे की, FASTag  यंत्रणा सर्व पथकर नाक्यावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस, आयडीएफसी आदी बँक शाखेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर FASTag online purchase पोर्टल वरही उपलब्ध आहे.गुगल प्ले स्टोअरवर  My FASTag ॲप्लिकेशन उपलब्ध आहे.

FASTag काय आहे ? 
 FASTag एक पातळ ईलेक्ट्रॉनिक चिप आहेही चिप वाहनांच्या दर्शनी भागात चिकटविण्यात यावी.ही चिप निश्चित केलेल्या रक्कमेला खरेदी करता येईलही चिप ग्राहकांच्या बैंक अकाऊंटला जोडता येते.

FASTag कसे काम करते?

FASTag चिकटवलेले वाहन पथकर नाक्यावरुन पुढे जाईल त्यावेळेस निश्चित केलेला पथकर वाहनधारकाच्या  FASTag अकाऊंटमधून वजा होईल. FASTag ओळखण्यासाठी पथकर नाक्यावर विशेष उपकरणे बसविण्यात आली आहेतत्याव्दारे FASTag चिप ओळखली जाईलचिप स्कॅन झाल्यावरपथकर नाक्यावरील बूम आपोआप उघडले जाईल आणि वाहनास थांबावे  लागता पुढे जाता येईल.

FASTag वापरण्याचे फायदे

FASTag च्या वापरामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहेयाबाबत ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकता यांनी सविस्तर अभ्यास केला आहेत्यानुसार दरवर्षी देशभरात ८७ हजार कोटी रुपयांची बचत होईलत्याचबरोबर पर्यावरणसंवर्धनालाही हातभार लागणार आहे, असेही श्री. संजय कदम यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages