पाळणाघर योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर :- जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सन 2019-20 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद क्षेत्रासाठी (ग्रामीण) राष्ट्रीय पाळणाघर योजनेअंतर्गत पाळणाघर मंजूरीबाबतचे प्रस्ताव पात्र संस्थांनी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी जे. एस. शेख यांनी केले आहे. योजनेसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे – पाळणाघर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायत) कार्यक्षेत्रात असावे. संबंधीत ग्रामपंचायतीने पाळणाघर सुरु करणेबाबत ठराव केलेला असावा. 30 टक्के निधीचा हिस्सा संबंधीत ग्रामपंचायतीने त्यांच्या स्वउत्त्पन्नातून उपलब्ध करुन देणेसाठी तयार असलेबाबत ठराव केलेला असावा. प्रस्ताव स्विकारण्याचा अंतिम दिनांक 14 नोव्हेंबर 2019 आहे. प्रस्ताव संबंधित तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी ( ग्रामीण ) यांच्याकडे आवश्यकत्या कागदपत्रासह सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक- 0217-2727624 वर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment