अकलूज येथे मारवाडी व नूखरा जातीच्या अश्वाचे प्रदर्शन व स्पर्धा . - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 22, 2019

अकलूज येथे मारवाडी व नूखरा जातीच्या अश्वाचे प्रदर्शन व स्पर्धा .

अकलूज येथे मारवाडी व नूखरा जातीच्या अश्वाचे प्रदर्शन व स्पर्धा.


अकलूज( प्रतिनिधी) लोकनेते स्व. प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे स्मरणार्थ महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक डॉ धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील व व इक्वेस्टरीयन स्पोर्ट्स असोसिएशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने धवल श्रीराम मंदिर ,अकलूज येथे शनिवार दि २३ व रविवार दि २४ रोजी भारतातील मारवाडी व नुखरा जातीतील नामांकित व जातिवंत अश्वाचे प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती संयोजक डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
               या पत्रकार परिषदेस वरून धूत ,जितेंद्र पडीया अमीर राठी ,मनीष पांड्या, दिनेश मिस्त्री, शशांक पवार, मयुर धवन  आदी मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनास व स्पर्धेस देशभरातून उत्तर प्रदेश ,पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, मध्यप्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विजेत्या अश्वाचा , ब्रीडर व अश्वप्रेमिंचा सहभाग असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages