पदवीधर नोंदणीची सोय गावा गावात करण्यासाठी प्रयत्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 18, 2019

पदवीधर नोंदणीची सोय गावा गावात करण्यासाठी प्रयत्न

पदवीधर नोंदणीची सोय गावा गावात करण्यासाठी प्रयत्न
कुर्डुवाडी-प्रतिनिधी.   पदवीधर मतदार नोंदणी साठी तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फॉर्म भरुन जमा करायचा,ही पदवीधरांची चेष्टा केली आहे. याऐवजी गावागावातून तलाठी व ग्रामसेवक यांच्या मार्फत नोंदणी करून घ्यावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने पुणे पदवीधर मतदारसंघ संभाजी ब्रिगेडचे उमेदवार उद्योजक इंजि.मनोज गायकवाड यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आणी निवडणूक उपजिल्हाधिकारी सतिश धुमाळ यांना निवेदन देऊन केली. यावेळी रुपेश पाटील संभाजी ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, भगवान कोईगडे जिल्हा कार्याध्यक्ष, अभिजीत कांजर, सुरेश धनगर, निखील गायकवाड, प्रियांका कोईगडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages