महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १०० पेक्षा जास्त जागा निवडून येणार ः मिटकरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 18, 2019

महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १०० पेक्षा जास्त जागा निवडून येणार ः मिटकरी

मोहोळ (प्रतिनिधी)ः महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या शंभर च्या पुढे जागा निवडून येणार असून भाजपने सर्व मित्रपक्षांची वाट लावली आहे.नारायण राणे यांचा पक्ष सुद्धा भाजपात विलीन करण्याची नामुष्कि राणे वर आली आहे,तर सर्वात लाचार पक्ष म्हणून गिनीज बुकात शिवसेने ची नोंद झाली असल्याचे सांगून शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तरुणांच्या जोरावर परिवर्तनाची लाट महाराष्ट्रात येणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केले.
 मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अधिकृत उमेदवार यशवंत विठ्ठल माने यांच्या प्रचारार्थ कुरुल ता मोहोळ येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत अमोल मिटकरी हे बोलत होते,पुढे बोलताना ते म्हणाले की,भाजप-शिवसेना सरकारच्या काळात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या असून तरुणांना बेरोजगार करण्याचे काम यांनी केले आहे,या धर्मनिरपेक्ष राज्यात शिवसेनेने जातीयवादी काम केले असून मराठा क्रांती मोर्चा मध्ये असहकार्याची भूमिका बजावली असून मातोश्रीवर शिवजयंती व संभाजी महाराज जयंती साजरी केली जात नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.भाजप सरकारने महाराष्ट्रात फसवी कर्जमाफी केली असून तुम्ही जर राष्ट्रवादीची सत्ता दिली तर शेतकर्‍यांचे नेते शरद पवार हे पहिल्या कॅबिनेट मध्ये संपूर्ण कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याचेही यावेळी अमोल मिटकरी यांनी सांगितले. 
यावेळी माजी आ राजन पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,उमेश पाटील,अशोक सरवदे,गौरव खरात, निर्मला बावीकर,प्रकाश चवरे,जालिंदर लांडे,पांडुरंग ताठे आदींची भाषणे झाली.
यावेळी पंचायत समिती गटनेते तथा आरपीआय चे अशोक सरवदे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी माजी आ राजन पाटील,जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,जि प सदस्य बाळराजे पाटील,प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील,माजी उपसभापती मानाजी माने,उमेदवार यशवंत माने,तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,निरीक्षक निर्मला बावीकर,गौरव खरात,पं स सदस्य अशोक सरवदे,शिवाजी सोनवणे,जालिंदर लांडे,किशोर पवार,नानासाहेब डोंगरे,राजेश पवार,शाहीन शेख,सिंधु वाघमारे,यशोदा कांबळे,राहुल क्षीरसागर,दीपक माळी,सुरेश शिवपूजे,अस्लम चौधरी,शशिकांत पाटील,पांडुरंग ताठे,पप्पू पाटील,सतीश भोसले,भारत सूतकर,सज्जन पाटील,नागेश साठे,चंद्रहार पाटील आदीसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages