अकलूज (प्रतिनिधी) शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयमध्ये कार्यरत असलेले प्रा.योगेश नंदकिशोर इनामदार हे विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेमध्ये (सेट) उत्तीर्ण झाले असून त्यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयांमध्ये यश संपादन केले आहे.
प्रा.इनामदार सन 2014-15 पासून रत्नाई कृषी महाविद्यालयमध्ये सहा ग्रंथपाल पदावर कार्यरत असून ते भंडीशेगाव (पंढरपूर ) येथील रहिवासी आहेत त्यांनी एम.ए.(इतिहास) पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून पूर्ण केली असून पूर्ण केले असून एम फिल हो त्याच विषयांमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे मध्ये प्रथम श्रेणीत पूर्ण केलेली आहे तसेच एम लिब अँण्ड आय एस सी ही पदवी सन 2008 मध्ये संपादित केलेले आहे
त्यांच्या या यशामध्ये आई सौ विजया व वडील श्री नंदकिशोर इनामदार यांचा मोलाचा वाटा आहे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री जयसिंह मोहिते पाटील सचिव श्री अभिजीत रणवरे सहसचिव श्री हर्षवर्धन खराडे पाटील माजी प्राचार्य डॉ डी पी कोरटकर प्रा आर जी नलावडे व रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्यांचे या यशाबद्दल विशेष अभिनंदन केले .
No comments:
Post a Comment