जिल्ह्यात मतदानाच्या दिवशीचे सर्व आठवडे बाजार / यात्रा बंदचे आदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 18, 2019

जिल्ह्यात मतदानाच्या दिवशीचे सर्व आठवडे बाजार / यात्रा बंदचे आदेश

जिल्ह्यात मतदानाच्या दिवशीचे सर्व आठवडे बाजार / यात्रा बंदचे आदेश

सोलापूर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019  चा विहीत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून दिनांक 21 सप्टेंबर 2019  पासन आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडील प्राप्त निर्देशानुसार मतदाना दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन मतदान प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी 14 ऑक्टोबर 2019 अन्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदान आणि मतमोजणी दिनांकाचे दिवशी तालुक्यातील / गावातील भरणारे आठवडे बाजार/ बाजार जत्रा बंद ठेवण्यास अथवा पुढे ढकलण्यास हरकत नसलेबाबत कळविले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 च्या जाहीर कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील मतदार संघाचे मतदान दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे व यास अनुसरुन सोलापूर जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांचेकडून प्राप्त अहवालानुसार मतदानादिवशी खालील तक्त्यात नमुद गावात आठवडा बाजार भरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम,कलम 37 (3) अन्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणक-2019 च्या अनुषंगाने मतदान केंद्राच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखणेसाठी दिनांक 21 ऑक्टोबर 2019 या मतदानादिवशी सोलापूर जिल्ह्यातील (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) खालील गावांचे आठवडा बाजार भरविण्यास मनाई करणेत येत आहे, असे आदेश  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
तालुका गावाचे नांव मतदार संघाचा तपशील - दक्षिण सोलापूर,251 विधानसभा मतदार संघ  –टाकळी, कणबस, बार्शी 246 विधानसभा मतदार संघ- मालवंडी, सुर्डी, गौडगाव, भालगाव, अक्कलकोट 250 विधानसभा मतदार संघ -अक्कलकोट शहर पंढरपूर 252 विधानसभा मतदार संघ – राझणी,  करकंब, फुलचिंचोली, मंगळवेढा 252 पंढरपूर –मंगळवेढा विधानसभा मतदार संघ- सलगर बु, मंगळवेढा, सांगोला 253विधानसभा मतदार संघ- लक्ष्मीनगर, घेरडी, जुनोनी, माळशिरस 254 विधानसभा मतदार संघ- अकलुज, कण्हेर, मोहोळ 247 विधानसभा मतदार संघ -कामती बु., नरखेड पेनुर, आष्टी, उत्तर सोलापूर 247 मोहोळ विधानसभा मतदार संघ- नान्नज, करमाळा 244 विधानसभा मतदार संघ- जेऊर, साडे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages