बॅकांनी एक लाखाच्या वरील संशयास्पद व्यवहाराची माहिती द्यावी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 18, 2019

बॅकांनी एक लाखाच्या वरील संशयास्पद व्यवहाराची माहिती द्यावी

 बॅकांनी एक लाखाच्या वरील संशयास्पद  व्यवहाराची माहिती द्यावी

सोलापूर
 :- भारत निवडणूक आयोग,यांचेकडील निवडणूक खर्चाचा सारसंग्रह फेब्रुवारी 2019 मधील जोडपत्र 13 च्या पत्रान्वये जिल्हयातील सर्व राष्ट्रीयीकृत बँक व सहकारी बँकमार्फत करण्यात येणा-या संशयास्पद रोख व्यवहारांच्या संबंधात आज दि. 18 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,सेतू हॉल,सोलापूर येथे सर्वसाधारण निवडणूक निरिक्षक शिवराजसिंग वर्मा, श्रीधर चित्तूरी, डॉ. श्रीधर चेरुकिरी तसेच मा.खर्च निरिक्षक- राघवेंद्र पी, अरविंद विवेकानंदन,मनिष व्दिवेदी, राधानाथ पुरोहित व निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी जिल्हयातील अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.सोनवणे व सर्व राष्ट्रीयीकृत बँक व्यवस्थापक, सहाकारी बँकाचे व्यवस्थापक यांची एकत्रित बैठक घेण्यात आली.
 बैठकीत जिल्हयातील सर्व राष्ट्रीयीकृत बँक व सहकारी बँकमार्फत करण्यात येणा-या संशयास्पद रोख व्यवहारांच्या संबंधात कार्यवाही करण्याबाबत सक्त सुचना देण्यात आली. व याबाबतचा दि.15 सप्टेंबर 2019 ते आजतागायत एक लाखावरील व्यवहारासंबंधी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास देणेबाबत अवगत करण्यात आले.  यावेळी नोडल अधिकारी (खर्च सनियंत्रण पथक)महेश आवताडे व खर्च समन्वयक श्री.धनराज पांडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages