दबावाला भिक न घालता आ.बबनदादा शिंदे यांना मतदान करा – धवलसिंह मोहीते पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 14, 2019

दबावाला भिक न घालता आ.बबनदादा शिंदे यांना मतदान करा – धवलसिंह मोहीते पाटील

दबावाला भिक न घालता आ.बबनदादा शिंदे यांना मतदान करा – धवलसिंह मोहीते पाटील


संजय पाटील भिमानगरकर यांची उपस्थिती
प्रतिनिधी-
यापुढे कोणाच्याही दबावाला न घाबरता निर्भयपणे पुढे येऊन माढा विधानसभेचे लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांना मतदान करा असे आवाहन जनसेवा संघटनेचे अध्यक्ष धवलसिंह मोहीते पाटील यांना माळशिरस तालुक्यातील उंबरे(वे) येथील जाहीर प्रचार सभेत केले आहे.
यावेळी व्यासपीठावर आ.बबनदादा शिंदे, जि.प.चे माजी कृषी सभापती संजय पाटील(भिमानगरकर), कारखान्याचे संचालक बबनबापू पाटील,नवनाथ पवार, माणीक मिसाळ, आण्णासो शिंदे,कुंडलिक रेडेपाटील,सुजित थिटे आदी मान्यवर उपस्थित होते.

धवलसिंह मोहिते पाटील पुढे म्हणाले की, पूर्ण विचार करूनच जनसेवा संघटनेने आता विकासप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वर्गीय प्रतापसिंह मोहीते पाटील व बबनदादा यांचा जिव्हाळा माहीती आहे. परंतु सध्या विश्वासघाताचे राजकारण केले जात आहे. ज्या विजयदादांच्यासाठी खासदारकीच्या निवडणूकीत बबनदादांनी जीवाचे रान केले, त्यांनी विधानसभा निवडणुकीत विश्वासघात केला. म्हणून यापुढे असे दडपणाचे, भिताची राजकारण चालू दिले जाणार नाही व यासाठी कै.शंकरराव मोहीते व प्रतापसिंह मोहीते यांचा वारस म्हणून मी तुमच्या बरोबर राहणार आहे. कोणी आडवे आलेतर मला कधीही बोलवा. निर्भयपणे बबनदादांना मतदान करून खा.शरद पवार यांना पाठबळ द्या.

याप्रसंगी माजी कृषी सभापती संजय पाटील भीमानगरकर म्हणाले की, मागील 25 वर्षात आम्ही बबनदादांना तत्वासाठी विरोध केला. परंतु विकासाच्या मुद्यावर कधीच विरोध केला नाही.आ.शिंदे यांनीच मला सभापती पदाची जि.प.मध्ये संधी दिली. विठ्ठलराव शिंदे कारखाना चांगल्याप्रकारे चालवून बबनदादांनी ऊसाला दर चांगला दिला आहे. परंतु ज्यांचा ऊस नाही तेच कारखान्याबद्दल तक्रार करतात. ज्यांचा आहे ते कधीच तक्रार करत नाहीत.

समोरचा शिवसेनेचा उमेदवार कर्तृत्वशुन्य असून बबनदादांच्या बरोबर त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. भाजपाचा अध्यक्ष सेनेचा उमेदवार होतो. हे तात्वीक मुद्याला धरून नाहीच. म्हणूनच मी व माझ्या कार्यकर्त्यांनी बबनदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विक्रमीमतांनी विजयी करण्याचा आम्ही चंग बांधला आहे. यापुढे कोणीही भिण्याचे कारण नाही. कारण धवलदादा आता आपणाबरोबर आहेत. भिण्याचे कारण नाही.
आ.बबनदादा शिंदे म्हणाले की, माढा विधानसभेच्या समाविष्ठ 14 गावात विकास कामे करताना खुप अडथळे येत आहेत. परंतु आता धवलदादा जे सांगतील त्याप्रमाणे विकासाची कामे केली जातील. तरीही मागील 10 वर्षात या भागा सभामंडप, रस्ते, विज व भिमानदीवरील 13 कोटी रूपयाचा पुल आदी विकास कामे आम्ही केलेली आहेत. पवारसाहेबांचे स्थान बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन बबनदादांनी यावेळी केले. तसेच धवलसिंह मोहीते,संजय पाटील, बाळासो पाटील(शेकाप) यांचे हजारे कार्यकर्ते माझ्याबरोबर यापुढे असल्यामुळे मला कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. परंतु कोणीही गाफील राहून चालणार नसल्याचेही बबनदादांनी आवर्जून सांगितले.


माळशिरस तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या वाफेगाव, मिरे,वाघोली,लवंग, उंबरे(वे),कोंढारपट्टा,नेवरे,जांभूड, माळेवाडी व महाळुंग यागावी आ.बबनदादा शिंदे यांचा प्रचारदौरा संपन्न झाला. याप्रसंगी देविदास पवार,गोपीनाथ झुरळे,राम भोसले,ज्ञानेश्वर थिटे,दिपक थिटे,शिवाजी थिटे,सुजित थिटे(उंबरे वे.),शिवाजी पाटील, रावण पाटील,माऊली जोरवर,सचिन पाटील,अमरजित पाटील,विकास मगर,सागर साठे,संदीप नष्टे, धोंडीराम जाधव(मिरे),उत्तम भोसले,राहूल टीक,उत्तम भोसले, आप्पासो चव्हाण,भिमराव चव्हाण,धनाजी वाघ,प्रदिप कदम(लवंग)माणिक मिसाळ,दत्तु मिसाळ,अजिनाथ चव्हाण,हरिनाना चव्हाण,पिंटू पाटील,रवी पाटील, दत्ता पाटील, बापू पताळे,योगेश शेंडगे,युवराज मिसाळ,दिलीप मिसाळ(वाघोली),दत्ता शिंदे, पाडूंरंग शिंदे, मधुकर यादव,अशोक चव्हा, अक्षय शिंदे,विष्णु गाडे, विवेक शिंदे(वाफेगांव) आदी गावोगावचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages