*ज्या देशाची सुरक्षा व्यवस्था बळकट नाही ते देश काय चालवतील -*प्रा अजित अभ्यंकर*
सोलापूर प्रतिनिधी - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 249 सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून कॉ नरसय्या आडम मास्तर हे उभे आहेत.त्यांचा प्रचारार्थ कर्णिक नगर येथील स्थानिक ज्येष्ठ नागरिक मालोजी मस्के यांच्या अध्यक्षतेखाली कोपरा सभा पार पडली.
माकप चे प्रवक्ते प्रा .अजित अभ्यंकर सभेला संबोधित करताना म्हणाले की, आज महाराष्ट्रात अभूतपूर्व पक्षांतर पाहावं लागत आहे कारण इथल्या सत्ताधाऱ्यांनी पैसा आणि पोलीस यंत्रणेचा सर्रास गैरवापर करून भ्रष्टाचारी नेत्यांना धकामावून पक्षांतर कारायला भाग पाडत आहेत आणि यांना त्यांच्यकडून टक्केवारी घेऊन गोमूत्राने पवित्र करण्याची लज्जास्पद गोष्ट घडत आहे ही ही लोकशाहीला मारक आहे अशी टीका केली.
ते बोलताना म्हणाले सरकारी यंत्रणा पद्धतशीर पणे उद्धवस्त करणे चालू आहे.सरकार म्हणतंय सरकार स्टाफ जास्त झालेला आहे आता कर्मचारी कपात केल्याशिवाय पर्याय नाही.सरकारी यंत्रणा काम करीत नाही.बांधकाम कामगार कल्याणकर चा आज सरकारी तिजोरीत आठ हजार तीनशे पस्तीस कोटी इतका कर जमा आहे ही रक्कम व्याजासहीत तेरा हजार कोटी जमा झालेले आहेत.आज राज्यात 44 लाख बांधकाम कामगार काम करत आहेत मात्र प्रत्यक्ष सरकार कडे 3 लाख नोंदणी आहे.गेल्या दहा वर्षात फक्त चारशे त्रेपन्न कोटी खर्च केले.यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले तरीही सरकार मौनच.या सरकारने एकूण रकमेच्या एक दशांश रक्कम ही कामगारांवर खर्च केला जात नाही असा आरोप ते केले.
या देशातील 50 कलावंत, बुद्धिजीवी वर्गातील मंडळींनी दस्तुरखुद्द पंतप्रधानाना पत्र लिहिले की तुमच्या पक्षाचे लोक कोणालाही अडवणूक करून मारहाण करत आहेत.धर्माच्या नावावर असे करणे थांबवा.असे म्हणणाऱ्यांना देशद्रोह गुन्हा नोंदवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.यावरून या देशातील लोकशाही कोणत्या थराला पोहोचली हे लक्षात घ्या.ज्या देशाची सुरक्षा व्यवस्था, न्याय व्यवस्था बळकट नाही तो देश कसा चालवणार असा सवाल त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर कॉ नरसय्या आडम मास्तर,भा क प चे ज्येष्ठ नेते प्रा.तानाजी ठोंबरे, नगरसेविका कॉ.कामीनीताई आडम,माजी नगरसेविका नसीमा शेख,अँड सुनील पवार,महिबूब हिरापूरे,अंबादास तडकापल्ली, प्रविण मस्तूद,अनिल वासम आदी उपस्थित होते. प्रास्तविक प्रा.सिद्धाराम उमराणी यांनी केले.जाते
यावेळी अँड सुनील पवार,अँड एम एच शेख,प्रा तानाजी ठोंबरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ अनिल वासम यांनी तर पुष्पा पाटील यांनी केले.
सदर कोपरा सभा यशस्वी करण्यासाठी राजू उडानशिव, शंकर सदाफुले सोहेल मुल्ला,विजय लोकरे,प्रकाश ,वाघमारे,लकी कोंका, आरीफ पठाण,दशरथ वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment