राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री भारत भालके यांच्या प्रचारार्थ युवा नेते श्री भगिरथदादा भालके यांची पंढरपूर शहरात पदयात्रा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 10, 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री भारत भालके यांच्या प्रचारार्थ युवा नेते श्री भगिरथदादा भालके यांची पंढरपूर शहरात पदयात्रा


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री भारत भालके यांच्या प्रचारार्थ
 युवा नेते श्री भगिरथदादा भालके यांची पंढरपूर शहरात पदयात्रा 

विधानसभा 2019 च्या निवडणुकीचे पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री भारत भालके यांच्या प्रचारार्थ सकाळी पंढरपूर शहरातील श्रीदत्त लॉज-सावरकर चौक- चौफाळा-भादुले हौद- नाथ चौक- भजनदास चौक- श्रीदत्त घाट- श्री विठ्ठल मंदिर परिसर- महाद्वार घाट- वीणेगल्ली या परिसरामध्ये तसेच दुपारी शहरातील स्टेशन रोड- गणेशनगर- परदेशी नगर- विस्थापित नगर- पद्मावती- लहूजी वस्ताद चौक येथे युवा नेते श्री भगिरथदादा भालके यांनी पदयात्रा काढल्या.
सदर पदयात्रेनिमित्त ठिक-ठिकाणी श्री भगिरथदादा भालके यांचे स्वागत करण्यात आले. तसेच बर्‍याच ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. सदर पदयात्रेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
सदर पदयात्रेत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व सर्वश्री संजयआप्पा भिंगे, श्रीकांत शिंदे, राजाभाऊ भादुले, राजाभाऊ उराडे, अर्जुन चव्हाण, संतोष बंडगर, संदीप पाटील, बाळू शेख, रौफ बागवान, संजय घोडके, गुलाब मुजाणी आदींसह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages