"गोरगरिबांच्या विकासासाठी माझी लढाई--ऍड शहाजी बापू पाटील..
सांगोला ((प्रतिनिधी) - सांगोला तालुक्यातील कायमचा दुष्काळ हटवण्यासाठीब बेरोजगाराचा प्रश्न मिटवण्यासाठी ,तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आणि युती शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वत्र विकासाचे नंदनवन करण्यासाठीआज मी आपणाला मतदानरुपी आशीर्वाद मागण्यासाठी आपणास समोर उभा आहे, असे मत सेना-भाजपा व मित्रपक्षमहायुतीचे अधिकृत उमेदवार ऍड शहाजीबापू पाटील यांनी प्रचारादरम्यान लक्ष्मीनगर ता- सांगोला येथे व्यक्त केले.
महायुतीचे अधिकृत उमेदवार ऍड शहाजीबापू पाटील यांच्या प्रचार सभेचे आयोजन आज लक्ष्मीनगर, आचकदाणी, महिम, कटफळ, लोटेवाडी, गायगव्हाण, खिलारवाडी या गावांमध्ये आयोजन केले होते, यावेळी त्यांनी प्रचार सभेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारीचा हेतू स्पष्ट करताना नेहमीच विकासापासून कोसो दूर राहिलेल्या गावांना नक्कीच आपल्या नेतृत्वाखाली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मला निवडून द्या, नक्कीच ग्रामीण भागातील चेहरामोहरा बदलण्यासाठी माझा प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. यावेळी बापूंच्या प्रचार सभा दरम्यान जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य,विविध गावचे सरपंच, उपसरपंच आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment