शिवसेनेच्या बंडखोरांना १४ तारखेपर्यंतची अंतिम डेडलाईन ; अन्यथा कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 10, 2019

शिवसेनेच्या बंडखोरांना १४ तारखेपर्यंतची अंतिम डेडलाईन ; अन्यथा कारवाई



सावंत बंधू कोणाच्याही चहाच्या मिंध्यात नाहीत ; प्रा. शिवाजी सावंत

शिवसेनेच्या बंडखोरांना १४ तारखेपर्यंतची अंतिम डेडलाईन ; अन्यथा कारवाई
महेश कोठेंवर अन्याय झालाच नाही ;शिवसेनेने भरपूर दिले

--------------------------------------
सोलापूर- ( प्रतिनिधी ) - महेश कोठे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले तेव्हा सेनेने त्यांची जात बघितली नाही,१०५ नगरसेवकांचे एबी फॉर्म कोणाला द्यायचे याचे सर्व अधिकार त्यांना देताना सेनेने त्यांची जात बघितली नाही,सेनेत आल्यानंतर त्यांना सहा महिन्यात आमदारकीचे तिकीट दिले तेव्हा सेनेने त्यांची जात बघितली नाही, विरोधी पक्षनेतेपत देताना तसेच जवळच्या व्यक्तीला स्वीकृत सदस्य करताना सेनेने त्यांची जात बघितली नाही, नेमके आज त्यांना विधानसभेच्या तिकिटाबसून बाजूला ठेवले असतानाच त्यांची जात कशी काय वर आली ? आताच कोठे यांनी जातीचे कार्ड कसे आणले, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी महेश कोठेंवर कोणताही अन्याय झालेला नसून शिवसेनेने त्यांना भरपूर काही दिले असल्याचे सांगत येथे १४ तारखेपर्यंत बंडखोरीबाबत निर्णय न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. शिवसेनेत कधीही जातीपात केला जात नाही,जात बघितली जात नाही,त्याचे काम बघितले जाते आणि त्या मतदारसंघामध्ये तो आमदार म्हणून निवडून येईल कि नाही याची कुवत बघितली जाते , आणि नंतर तिकीट दिले जाते असेही प्रा. सावंत म्हणाले.
अजूनही वेळ गेलेली नाही, बंडखोरांनो परत या,ज्यांना - ज्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे , त्यांचा प्रचार करा आणि यामध्ये सामील व्हा . सेनेतून बाहेर पडला तर शेवटी एकाकी पडाल. शिवसेनेत परत येण्याचे रस्ते बंद होतील. ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली आहे,त्याबाबत १४ तारखेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यादिवशी ठाकरे जे निर्णय घेतील तो निर्णय मान्य करणार असल्याचेही प्रा. सावंत यांनी सांगितले. झालेली चूक निस्तारून परत या ,सर्वांनी एकत्र मिळून काम करूयात ,अजून कोणालाही निलंबित केलेले नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. एबी फॉर्म हातून काढून घेण्याला ते काही चित्रपटाचे किंवा रेल्वेचे तिकीट नाही, सचिवांच्या सहीचे असणारे तिकीट उमेदवाराला समक्ष बोलावूनच दिले जाते,कोणाच्यासुद्धा हातात ते दिले जात नाही. त्यामुळे सेनेच्या उमेदवारीचा फॉर्म संपर्कप्रमुखांच्या हाती देण्यात आला होता. त्यांना सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्याचे अधिकार दिले होते. निवडून येण्याची शक्यता व निवडून येणारे आहेत त्यांनाच फॉर्म देण्यास सांगण्यात आले होते,त्यानुसार एबी फॉर्म देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.
सेनेत पैसे घेऊन उमेदवारी दिली जात नाही,कोणाला तिकीट द्यायचे हे उद्धव ठाकरे आणि संबंधित जिल्ह्याची टीम ठरविते. ज्यांनी असे बेछूट आरोप केले आहेत त्यांनी पैसे घेतल्याचे सिद्ध करून दाखवावे. सावंत कुटुंबियांवर आरोप करणे अत्यंत चुकीचे असून सावंत बंधू कोणाच्याही चहाच्या मिंध्यात नाहीत. जाणूनबुजून सावंत परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे,असे प्रा. सावंत म्हणाले. सावंत बंधू आल्यापासून त्यांनी शिवसेना वाढवली आहे,सावंत यांनी शिवसेना संपवली हे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांचा आरोप चुकीचा असल्याचे सांगत खंदारे आता भाजपात असल्याचे ते म्हणाले. आमदार नारायण पाटील यांनी करमाळा मतदारसंघात किती काम केले याचे आत्मचिंतन करावे. काम करत असताना इतर समाजाला त्यांनी किती न्याय दिला. ज्या समाजाचे ते प्रतिनिधित्व करतात त्यांनी धनगर समाजाचे किती कल्याण केले,नारायण पाटील यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी किती आंदोलने केली आणि कीतीवेळा ते उपोषणाला बसले याचा जबासुद्धा प्रा. सावंत यांनी यावेळी विचारला.
पत्रकार परिषदेला लक्ष्मीकांत ठोगे - पाटील, हरिभाऊ चौगुले,प्रताप चव्हाण, अस्मिता गायकवाड,विष्णू कारमपुरी, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील,नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, उज्वताई येलूरे ,विठ्ठल वानकर , अरुण जाधव, योगेश भोसले,मनीष काळजे , प्रसाद निळ आदी मान्यवर उपस्थित होते.
=== महेश कोठे यांची विनाशकाले विपरीत बुद्धी === महेश कोठे यांना संपर्क करण्यात आला होता. मात्र महेश कोठे यांचा संपर्क झाला नाही. देवेन्द्र कोठे यांनीसुद्धा फोन उचलला नाही. त्यानंतर आपण स्वतः महेश अण्णा यांना वॉट्सअपसुद्धा केला. त्यानंतर देवेन्द्र यांनासुद्धा वॉट्सअप केला. संपर्क होत नसल्याचे दिसून आल्यानंतर बंधू विठ्ठल वानकर यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविले. त्यांना भेटण्याची विनंती सांगितली. मातोश्रीचे बोलणे करून द्यायचे होते . उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वरचे कोणी असतील त्यांच्याशी बोलू असे वक्तव्य देवेन्द्र कोठे यांच्याकडून आले. जे कोण बोलणार आहेत त्यांना फोन करण्यास सांगा असे उत्तर आले. त्यामुळे आपल्याला कोणी संपर्क साधला नाही हे कोठे यांचे बोलणे खोटे आहे,त्यांनी ठरवले होते कि त्यांना काय करायचे आहे. प्रसारमाध्यमांना त्यांनी खोटी माहिती दिली. पक्षाने त्यांची समजूत काढण्यासाठी किंवा त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाने केला होता. मात्र कोठे यांची विनाशकाले विपरीत बुद्धी ,त्यांनी संधीचे सोने केले नाही. मातोश्रीला आपण तसाच निर्णय सांगितला , असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages