माधव नगर ला 25 वर्षाच्या जोखडातून मुक्त करत सात बारा मिळवून दिले.
पूर्व भागातील पद्मशाली समाजबांधवांना गुलाम बनवणाऱ्या शिंदे पिता पुत्रीस शहर मध्य मधून हद्दपार करा - आडम मास्तर
सोलापूर प्रतिनिधी - आपण मुख्यमंत्री असताना 25 -30 कोटी शासनाकडून व्यवस्था केली असते तर औद्योगिक बँक जिवंत राहू शकली असते त्यामुळे सोलापूर यशवंत गिरणी वाचल्या असत्या.परंतु त्यांना पद्मशाली गुलाम बनवून समाजाचे अस्तित्व मुळापासून संपवायचे होते.मात्र नांदेड तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड साठी राज्य शासनाकडून 100 कोटी रुपयांची तरतूद करून बँकांना संजीवनी दिली.
गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सांय 6 आयोजित माधव नगर येथील कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले.तिथे ते बोलत होते.
ते बोलताना पुढे म्हणाले, माधव नगर 25 वर्षांपासून सिलिंग वर असणारी जमीन सातबारा वर मालकी हक्क मिळवून देण्यासाठी सरकार भाग पाडले.याची कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आली तेव्हा आपले कर्तव्य बजावले पाहिजे.
सोलापूरातल्या गिरण्या बंद पडले याला जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण कारणीभूत आहे त्याच्याच कित्ता गिरवत
पूर्वभागातील सहकारी नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे विव्हको प्रोसेस, इंदिरा बँक,मर्चंट बँक,नागरी बँक या दिवाळखोरीत काढल्या.सोलापूरात जुनी गिरणी1964 साली बंद पडली त्यावेळी आडम मास्तर राजकारणात प्रवेश ही केले नव्हते.नरसिंग गिरजी गिरणी राज्य सरकारने बंद पाडली.
जाम मिल कधी बंद पडली याचा कुणालाच पत्ता लागला नाही. लक्ष्मी विष्णू गिरणी गैर व्यवस्थापन आणि नियोजनाच्या अभावामुळे बंद पडली.तसेच सोव्हिएत युनियन कडे फार मोठे बाजारपेठ होते.परंतु या सोव्हिएत युनियनची विभागणी झाल्यानंतर बाजारपेठ संपुष्टात आले.इथल्या उद्योजकांनी पर्यायी बाजारपेठ निर्माण करू शकले नाही.सन 1989 साली लक्ष्मी विष्णू ला गरगर लागली याला आडम मास्तर कसे जबाबदार आहेत सांगावं ?
यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत चिटमील, नरसय्या सुंचू, विजय गोरन्टला, अशोक इंदापुरे, अशोक तंबोलू, शेवंता देशमुख, मशाप्पा विटे अनिल वासम आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment